⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

गिरीश महाजनांना यामुळेच म्हणतात भाजपाचा संकट मोचक; राज्यसभा निवडणुकीतही दाखविला करिष्मा

जळगाव लाईव्ह न्यूज : विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे भाजपाचे आमदार गिरीश महाजन हे संकटमोचक म्हणून ओळखले जातात. (Sankatmochak Girish Mahajan) आतापर्यंत लोकसभा, विधानसभा, महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदांसह अन्य स्थानिक निवडणुकांमध्ये त्यांनी करिष्मा दाखविला आहे. मात्र आता त्यांनी राज्यसभा निवडणुकीतही करिष्मा दाखवित ते खरोखरच भाजपाचे संकटमोचक असल्याचे सिध्द केले आहे. कारण राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची मते फोडण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. गिरीश महाजनांनी खेळलेल्या डावपेचांमुळे आघाडीची तब्बल ९ मते फुटली आहेत. यामुळे भाजपाचे सहावे उमेदवार धनंजय महाडीक यांच्या विजयाचा मार्ग सोपा झाला.

भाजपा व महाविकास आघाडीसाठी अत्यंत प्रतिष्ठेची झालेल्या राज्यसभा निवडणुकीत भाजपाने बाजी मारली. यामुळे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचीच सरशी झाली आहे. यात सर्वात मोठी भुमिका निभावणारे भाजपाचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे आमदार गिरीष महाजन यांनी आपला करिष्मा दाखविला आहे. कारण निवडणुकीत भाजपाचे तिन तर शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसचा प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाला. या निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. कारण, महाविकास आघाडीची जवळपास ९ मते फुटली असल्याचे समोर आले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी खेळलेल्या खेळीला यश आले आहे. यात पुन्हा एकदा भाजपाचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे आमदार गिरीष महाजन यांनी आपला करिष्मा दाखविला आहे.

राज्यसभा निवडणूक सुरुवातीपासून अत्यंत प्रतिष्ठेची झाली होती. यात एक एक मत महत्वाचे होते. पक्षिय बलाबल पाहता भाजपाचे २ व शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसचा प्रत्येकी १ उमेदवार निवडून येणे सहज शक्य होते. मात्र खरी चुरस होती ती सहाव्या जागेसाठी! महाविकास आघाडीने अपक्षांच्या मदतीने शिवसेनेचा सहावा उमेदवार निवडून येणारच अशी भीमगर्जाना संजय राऊत करत होते. अशा या प्रतिष्ठेच्या निवडणूकीत अपक्षांची मनधरणी करण्यासह महाविकास आघाडीची मते फोडण्याची जबाबदारी फडणवीसांनी गिरिश महाजनांवर सोपविली होती. यामुळे गेल्या चार-पाच दिवसांपासून महाजन कमालीचे सक्रिय झाले होते. त्यांची मेहनत व आकडेमोड फळाला आली असून महाविकास आघाडीची ९ मते फुटली आहेत. यामुळे सहाव्या जागेवर भाजपाने बाजी मारली.

निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर गिरिष महाजन यांनी विरोधकांचा चांगलेच डिवचले. विधानभवना बाहेर त्यांनी आता कसं वाटतयं… गोडगोड वाटतयं…, जो हमसे टकरायेंगा, मिट्टी में मिल जायेंगा… अशी घोषणाबाजी करत विरोधकांना चिमटे काढले. त्यांच्या या घोषणाबाजीमध्ये फडणवीस यांच्यासह भाजपाचे सर्वच आमदार सहभागी झाले होते. या निकालामुळे जसे केंद्रात फडणवीसांचे वजन पुन्हा वाढले आहे तसेच महाजनांचेही राज्यात वजन वाढले आहे, यात दुमत नाही.

हे आहेत विजयी उमेदवार
या निवडणुकीत २८५ आमदारांनी मतदान केले. परंतु मतमोजणीवेळी नाट्यमय घडामोड घडली. रात्री उशिरा झालेल्या मतमोजणीत पहिल्या पसंतीची मतं घेऊन शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी आणि भाजपचे पीयूष गोयल व अनिल बोंड विजयी झाले. तर सहाव्या जागेवर भाजपच्या धनंजय महाडिकांचा विजय झाला आहे. तर शिवसेनेच्या संजय पवार यांना पराभवाचा सामना करावा लागला.