---Advertisement---
महाराष्ट्र राजकारण

उज्ज्वल निकम लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात? या मतदारसंघातून लढणार?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ एप्रिल २०२४ । लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्यातील मतदानास सुरुवात झाली असून त्यानंतरही भाजपनं गेल्या निवडणुकीत जिंकलेल्या सर्व जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. पण उत्तर मध्य मुंबईत भाजपनं अद्याप तरी उमेदवार दिलेला नाही. त्यामुळे भाजप येथून कोणाला उमेदवारी मिळेल याकडे लक्ष लागले आहे. अशातच भाजप इथून ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना तिकीट देण्याची दाट शक्यता असून याबद्दलची घोषणा आजच केली जाऊ शकते.

ujjwal nikam 1 jpg webp

उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजन २०१४ पासून सलग दोन वेळा निवडून आल्या होत्या. पण यंदा त्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे कालच (दि २५) या मतदारसंघासाठी काँग्रेसनं वर्षा गायकवाड यांची उमेदवारी जाहीर केली. मात्र भाजपनं अद्याप तरी उमेदवार दिलेला नाही.

---Advertisement---

उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, अभिनेता सचिन खेडेकर यांची नावं चर्चेत होती. परंतु आता उज्ज्वल निकम यांना तिकीट देण्याची दाट शक्यता असून भाजपनं ८ ते १० दिवसांपूर्वी निकम यांच्याशी संपर्क साधला होता. उत्तर मध्यसाठी त्यांना विचारणा करण्यात आली होती. त्यांनी भाजपला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं समजतं. निकम यांचा चेहरा सुपरिचित आहे. ते ज्येष्ठ विधीज्ञ आहेत. त्यामुळे भाजपनं निकम यांना लोकसभेसाठी विचारणा केली होती.

उज्ज्वल निकम मूळचे जळगावचे आहेत. पण त्यांची कर्मभूमी मुंबई राहिली आहे. मुंबईशी त्यांचं जिव्हाळ्याचं नातं आहे. मुंबईत १९९३ मध्ये झालेले साखळी बॉम्बस्फोट असोत वा २६/११ चा दहशतवादी हल्ला, निकम यांनी महत्त्वाचे खटले हाताळले आहेत. त्यामुळे मुंबईकरांसाठी ते सुपरिचित चेहरा आहेत. निकम यांच्या नावाची घोषणा आज महाराष्ट्र भाजपचे निवडणूक प्रभारी दिनेश शर्मा करू शकतात

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---