⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

संजय राऊत म्हणजे खोट बोला पण रेटून बोला – गिरीश महाजन

जळगाव लाईव्ह न्यूज । Sanjay raut VS Girish mhajan । :भाजपा नेते गिरीश माजं यांनी संजय राऊत यांच्यावर टीकास्त्रात सोडले आहे. यावेळी महाजन म्हणाले कि, राऊत यांच्या बद्दल बोलायचं तर खोट बोल पण नेटाने बोल’ ही म्हण त्यांच्यावर तंतोतंत लागू पडते. ते नुसत्याच डरकाळ्या फोडत असतात. ते जे बोलत आहेत ते कधीच सत्य झाल नाहीये. प्रसिध्दीसाठी मोठ मोठ्याने बोलायच एवढंच काम संजय राऊत यांना येत.

बेकायदेशीपणे एक रुपयाची जमीन सापडली तर मी भाजपला दान करुन देईन, असं वक्तव्य ईडीने केलेल्या कारवाईनंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं होतं. त्यावर जामनेर येथे आपल्या निवासस्थानी भाजपचे नेते गिरीश महाजन हे पत्रकारांशी बोलत होते. ‘सगळी चौकशी होईल, सगळे पेपर समोर येतील, तेव्हा जनतेसमोर सर्व गोष्टी येतील, त्यामुळे खासदार संजय राऊत हे काहीही बोलत असले तरी त्या गोष्टीला आता अर्थ उरलेला नाही’, असं महाजन म्हणाले.

राज्यात कायदा व सुव्यवस्था शिल्लक नाही
राज्यात आता कुठेही कायदा व सुव्यवस्था शिल्लक राहिलेला नाही, राज्याचे गृहमंत्रीच, मोठ मोठे पोलीस अधीकारी जेलमध्ये जावून बसले आहेत, अनेक चौकशीच्या फेऱ्यात आहेत. असं म्हणत भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी महाविकास आघाडी सरकारवरही(MVA) टीकेची झोड उठवली. पोलीस बदल्यांच्या बाबतीत मोठा बाजार मांडला गेला. आणि पैसे वसुल करण्याच्या भानगडीत हे पडले आहेत अनेक मंत्री जेलच्या वाऱ्या करत आहेत. इतकी वाईट परिस्थिती पहिल्यांदाच राज्यात झाली आहे. पोलिसांना बदल्यांसाठी मोठ्याप्रमाणावर पैसे मागितले जात आहेत. यामुळे त्यांचं खच्चीकरण होत आहे, गुंड मोकाट सुटले आहेत. एवढी विदारक परिस्थिती राज्याची आहे. मात्र, हे पाहायला मुख्यमंत्र्यांना वेळ नाही, असं म्हणत गिरीश महाजन यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्दयावर ठाकरे सरकारचा जोरदार समाचार घेतला.