---Advertisement---
राजकारण महाराष्ट्र

तू काय उखाडणार? लाचार माणूस… संजय राऊतांची नेमकी कोणावर टीका?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जानेवारी २०२३ । ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तुम्ही आमची काय उखाडणार? तू कोण आहे? लाचार माणूस आहे म्हणत हल्ला चढवला.

sanjay raut 1 jpg webp

कोण आहात तुम्ही? आमच्या नादाला लागलात तर आम्ही काय आहोत हे दाखवून देऊ. आमचं आयुष्य रस्त्यावर गेलं. तू कधी रे कानफटात खाल्ली? खाल्ली का? मोठा भाईगिरी दाखवतो आम्हाला. या दाखवतो, असं आव्हानच संजय राऊत यांनी नारायण राणे यांना दिलं.

---Advertisement---

बाडगा जास्त मोठ्या बांग देतो असं बाळासाहेब ठाकरे म्हणायचे. तो सिलिंडर जास्त मोठं करतो. सध्या हे सिलिंडर वर करून बोलत आहेत. तुम्ही आमच्याविरोधात उभं राहिला. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी संयम राखायला सांगितलं. तुम्ही आमची काय उखाडणार? तू कोण आहे? लाचार माणूस आहे. दहापक्ष बदलतो घाबरून. डरपोक. आम्हाला डरपोकांना घाबरण्याचं कारण नाही, असा हल्लाही संजय राऊत यांनी चढवला.

माझ्या माहितीनुसार नारायण राणे यांचं केंद्रीय मंत्रीपद जातंय. त्याला कारणं खूप आहेत. नवीन गटातील लोकांना सामावून घ्यायचं आहे. त्यामुळे राणेंना काढायचं सुरू आहे असं ऐकलं. पीएमओकडे आमचीही माणसं आहेत. आम्हालाही माहिती मिळते. मला त्यात पडायचं नाही. तुम्ही आमच्यात पडू नका, असं राऊत म्हणाले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---