जळगाव लाईव्ह न्यूज । १९ ऑगस्ट २०२२ । संजय गांधी निराधार योजनेंतर्गत गोरगरीब, विधवा व वृद्धांना अनुदाना देण्यात येते. यात यावल तालुक्यातील गोरगरीब, विधवा व वृद्धांचे देखील संजय गांधी निराधार समितीच्या माध्यमातून गरजू लाभार्थींचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. मात्र, लाभार्थी गेल्या वर्षभरापासून अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांकडून विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.
यावल तहसील कार्यालयाच्या माध्यमातुन राज्य शासनाच्या वतीने संजय गांधी निराधार समिती गठीत असून या समितीद्वारे राज्य शासनाच्या सामाजीक व न्याय विभागाच्या माध्यमातुन विधवा, निराधार, वयोवृद्ध जेष्ठ नागरीक, इंदीरा गांधी भुमीहीन अशा घटकांना प्रतिमाह एक हजार मदत दिली जाते. मागील वर्षाच्या ऑगस्ट महीन्यात संजय गांधी निराधार योजना समितीच्या वतीने बैठकीत सुमारे चार शे प्रस्ताव मंजुर करण्यात आली असून या सर्व लाभार्थ्यांना तसे पत्र देखील प्राप्त झाले आहेत.
मात्र, असे असताना मागील एक वर्षापासुन त्यांच्या खात्यात अनुदान कधी पडेल या प्रतिक्षेत आहे. जिल्हाधिकारी यांनी संदर्भात पाठपुरावा करून प्रस्ताव मंजुर झालेले वयोवृद्ध जेष्ठ नागरीक, विधवा निराधार, इंदीरा गांधी भुमीहीन गोरगरीब लाभार्थ्याना अनुदानाचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी करण्यात येत आहे.