वाळूचे ट्रॅक्टर उलटले : तिघे जागीच ठार, दोन चुलत भावांचा समावेश

मे 19, 2022 11:29 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ मे २०२२ । वाळू उपसा करण्यासाठी जाणारे ट्रॅक्टर पलटी होऊन तीन जण जागीच ठार झाल्याची घटना भडगाव ते वडधे फाट्यादरम्यान रात्री ११ वाजेच्या सुमारास घडलीय. मृतांमध्ये दोन चुलत भावांचा समावेश आहे.

bhadgaon accident jpg webp

भडगाव -कोठली रस्त्यावर बुधवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास मयुरेश लॉन्सच्या पुढे ट्रॅक्टर पलटी झाले. यात सुरेश अशोक शिंदे (वय २७, रा. टोणगाव), रवी सुरेश शिंदे (वय २५, मयूर भोई (वय २१, रा. आझाद चौक, भडगाव) यांचा मृत्यू झाला.तर शामराव शिंदे (वय २३), आकाश रामकृष्ण पवार (वय २१), कैलास पवार (वय २१, सर्व रा. टोणगाव भडगाव) हे जखमी झाले आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुरेश आणि रवी हे दोघे चुलत भाऊ होते.

तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी भडगाव ग्रामीण रूग्णालयात (Hospital) आणण्यात आले होते. तर उशिरापर्यंत अपघाताची नोंद घेण्याचे काम सुरू होते. ट्रॅक्टर कसे पलटी झाले हे समजु शकले नाही.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now