अट्टल चोरटा ‘सायब्या’ एलसीबीच्या जाळ्यात

एप्रिल 6, 2021 9:18 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ एप्रिल २०२१ । अनेक वर्षानंतर जळगावात परतलेल्या अट्टल चोरट्याने पुन्हा चोऱ्या सुरू केल्याची माहिती मिळताच एलसीबीचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या पथकाने मध्यरात्री राबवण्यात आलेल्या कोंबींग ऑपरेशन दरम्यान त्याला ताब्यात घेतले आहे.

sayyabu shaikh

सायबोद्दीन उर्फ सायब्या शेख नजमोद्दीन शेख (परपोट मोहल्ला नशिराबाद ता.जि. जळगांव) असे चोरट्याचे नाव असून त्याला जळगाव शहरातील बळीराम पेठ भागातील शिवाजी चौक काट्याफाईल भागातून पळून जाण्याच्या बेतात असतांना चोरीच्या गॅस सिलेंडरसह ताब्यात घेण्यात आले आहे.

बळीराम पेठ भागातील रहिवासी अराफत अहमद यांच्या घराच्या वॉल कंपाऊंडमध्ये प्रवेश करीत दि.२ एप्रिल रोजी पहाटे ३ ते ४ च्या दरम्यान साहेब्या याने सिलेंडर चोरुन नेले होते. गॅस सिलेंडर चोरीप्रकरणी जळगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.

स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांच्य मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अशोक महाजन, हे.कॉ. जितेंद्र पाटील, पो.हे.कॉ.विजयसिंग धनसिंग पाटील, पो.हे.कॉ. सुधाकर रामदास अंभोरे, पो.हे.कॉ.विलास बाबुराव पाटील, पो.ना. नितीन प्रकाश बाविस्कर, पो.ना.राहुल जितेंद्रसिंग पाटील, पो.ना. प्रीतम पितांबर पाटील यांच्या पथकाने सायबोद्दीन यास मुद्देमालासह अटक केली. पुढील तपासकामी त्याला जळगाव शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now