⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

युद्धामुळे खाद्यतेलाचे दर पुन्हा भडकले ; जाणून घ्या काय आहेत नवे दर

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ फेब्रुवारी २०२२ । रशिया-युक्रेन युद्धामुळे खाद्यतेलाचे दर पुन्हा भडकले आहे. गेल्या आठवड्याभरात खाद्य तेलाच्या दरात जवळपास १० ते १५ रुपयांनी वाढ झाली आहे. दरम्यान, येत्या काळात आणखी भाववाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

भारत हा खाद्यतेलाची सर्वाधिक मागणी असलेला देश आहे. सर्वाधिक मागणी पामतेल, त्यानंतर सोयाबीन व तिसऱ्या क्रमांकावर सूर्यफुल तेलाची असते. पण मागणीच्या जेमतेम १५ टक्के तेल उत्पादन भारतात होते. त्यामुळेच भारताला दरवर्षी मोठ्या प्रमाणात खाद्यतेलाची आयात करावी लागते. त्यामध्ये सर्वाधिक आयात पामतेलाची होत असून इंडोनेशियावरून हे तेल कच्च्या स्वरूपात मागवले जाते.

सोयाबीन तेल बहुतांश प्रमाणात भारतात तयार होते. पण यंदा त्याचे गणितही बिघडलेले असल्याने सोयाबीन तेल उत्पादनात पाच टक्क्यांची घट आहे. त्यामुळे सूर्यफुल तेल आयातीवरच देशातील खाद्यतेलाची भिस्त आहे. तसे असताना रशिया-युक्रेन युद्धामुळे या तेलाची आयातदेखील संकटात आली आहे.

तेलाची आवक कमी झाल्यामुळे आठवड्याभरात १० ते १५ रुपयांनी दरवाढ झाली आहे. यात सर्वाधिक वाढ ही मोहरीच्या तेलात २० रुपयांनी वाढ झाली आहे. दरम्यान, आणखी दरवाढ होईल या भीतीने नागरिकांना तेलाची दुप्पट खरेदी करीत असल्याचे दिसून आले. जळगाव शहरात तेलाची होणारी आवक देखील ३० ते ४० %कमी झाली आहे.

खाद्यतेलाचे दर असे (रुपये/लिटर)
पूर्वीचे -सध्या
शेंगदाणा – १७५ १७५
सूर्यफूल – १५४ १६८
सोयाबीन – १५२ १६२
पाम- १४२ १५५
मोहरी -१७५ १९०

हे देखील वाचा :