तरुणांसाठी आनंदाची बातमी! भारतीय रेल्वेत तब्बल ६००० पेक्षा जास्त पदांसाठी भरती

जून 18, 2025 11:03 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । भारतीय रेल्वेत सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वे भरती बोर्डाने टेक्निशियन ग्रेड १ आणि टेक्निशियन ग्रेड ३ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. रेल्वेने देशभरातील १८ रेल्वे झोन आणि युनिट्ससाठी तब्बल ६,३७४ तंत्रज्ञ पदांच्या भरतीला मान्यता दिली आहे. RRB Technician Bharti

RRB Technician Bharti

रेल्वेमधील या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया २८ जून २०२५ पासून सुरु होणार आहे. लक्ष्यात असू द्या अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. आणि या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ जुलै २०२५ असणार आहे. या कालावधीतच इच्छुकांनी अर्ज करावेत. RRB Technician Recruitment

रिक्त पदाचा तपशील
टेक्निशियन ग्रेड १ सिग्नल पदासाठी १८० जागा रिक्त आहे. टेक्निशियन ग्रेड ३ ओपन लाइन पदासाठी ६००० जागा रिक्त आहेत. एकूण ६१८० रिक्त पदांसाठी भरती होणार आहे.

भरतीसाठी पात्रता :
टेक्निशियन ग्रेड १ पदासाठी ऑफ सायन्स फिजिक्स/ कॉम्प्युटर इलेक्ट्रॉनिक्स / कॉम्प्युटर सायन्स / इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी / इन्स्ट्रुमेशनमध्ये बॅचलर डिग्री प्राप्त केलेली असावी. किंवा बीएससी डिग्री इन फिजिक्स / इलेक्ट्रॉनिक्स / कॉम्प्युटर सायन्समध्ये डिप्लोमा केलेला असावा.

टेक्निशियन ग्रेड ३ पदासाठी १८ ते ३३ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. टेक्निशियन ग्रेड १ पदासाठी कमाल वयोमर्यादा ३६ निश्चित करण्यात आली आहे. या नोकरीसाठी लेखी परीक्षेद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

पगार : या नोकरीसाठी टेक्निशियन ग्रेड १ सिग्नल पदासाठी २९,२०० रुपये पगार आहे. टेक्निशियल ग्रेड ३ पदासाठी १९९०० रुपये पगार मिळणार आहे.
परीक्षा शुल्क : अर्ज करताना राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ५०० रुपये फी भरायची आहे तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्कात सूट मिळाली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment