जळगाव लाईव्ह न्यूज । १४ डिसेंबर २०२४ । रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. महाकुंभच्या पार्श्वभूमीवर लखनऊ विभागात दुहेरीकरणाच्या कामामुळे छपरा- लोकमान्य टिळक एक्सप्रेससह चार रेल्वे गाड्यांच्या मार्गामध्ये बदल करण्यात आला आहे. विशेष या गाड्या जळगाव, भुसावळामार्गे धावणाऱ्या आहे.
येत्या २० डिसेंबरपर्यंत हा बदल असणार आहे अशी माहिती रेल्वे विभागाने दिली. जळगाव भुसावळमार्गे धावणारी १५०१७ लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपुर एक्सप्रेस ही २० डिसेंबरपर्यंत प्रयागराज जंक्शन-फुलपूर-जांघई- वाराणसी जंक्शनमार्गे वळवण्यात आली आहे. ही गाडी प्रयाग, फाफामू, सराय चंडी, फुलपूर, उग्रसेनपूर, जांघई, सराय कंसराय, सूर्यावन, मोघ, भदोही, पारसीपूर, कापसेठी आणि सेवापुरी स्थानकांवर थांबणार नाही. १६ डिसेंबर रोजी सुटणारी १५१८२ लोकमान्य टिळक टर्मिनस-मऊ एक्स्प्रेस नियोजित मार्ग प्रयागराज जंक्शन प्रयागराज जंक्शन- बनारस वाराणसी जंक्शन-औंडीहार-मऊ ऐवजी प्रयागराज जंक्शन-फुलपूर-झांगहा ई-जाफराबाद-शहागंजमार गे वळवण्यात आली आहे.
१४, १७ आणि १९ रोजी छपरा येथून धावणारी ११०५९ छपरा-लोकमान्य टिळक टर्मिनल एक्स्प्रेस प्रयागराज जंक्शन-फुलपूर-जंगई-जाफराबाद शाहगंज मार्गे वळवली आहे. १५, १६, १८ आणि २० डिसेंबर रोजी धावणारी ११०५५ लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर एक्स्प्रेस प्रयागराज जंक्शन-फुलपूर-झांगहाई -जाफराबाद- शाहगंज- मऊ मार्गे धावणार आहेत.