---Advertisement---
जळगाव जिल्हा राजकारण

रोहिणी खडसे ‘त्या’ गोष्टीच्या आठवणीसाठी चंद्रकांत दादांना पाठवणार बदाम

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जून २०२४ । महाराष्ट्रातील मुलींना मोफत शिक्षण दिले जाणार असल्याची घोषणा काही दिवसापूर्वी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली होती. मात्र या घोषनेचा त्यांना विसर पडला असून त्यांना आठवण करून देण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी त्यांना बदाम पाठवत आहे असल्याची क्लिप सोशल मीडियावर टाकल्याने राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय ठरला आहे

khadse patil2 jpg webp

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसादिनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुलींना मोफत शिक्षण दिले जाईल अशी घोषणा केली होती. ज्या मुलींच्या पालकांचे उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी आहे, त्या मुलींना वैद्यकीय, अभियांत्रिकी, लॉ, असो की महाविद्यालयीन ६६२ व्यवसायीक कोर्सेससाठी कुठलीही फी लागणार नाही, शिक्षण मोफत करणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, घोषणेनंतर ४ महिने उलटूनही अद्याप अंमलबजाणवणी करण्यात आली नाही.

---Advertisement---

विशेष म्हणजे, १२ वी, पदवी, आणि पदव्युत्तर परीक्षांचे निकाल जाहीर झाले असून मुला-मुलींचे महाविद्यालयीन प्रवेशही सुरू झाले आहेत. मात्र, प्रवेशावेळी फी आकरण्यात येत असल्याने विद्यार्थींनींकडून विचारणा केली जात आहे. त्यातच, विरोधी पक्षातील नेत्यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांना लक्ष्य केले आहे. रोहिणी खडसे यांनी थेट बदाम पाठवत चंद्रकांत दादांना आठवण करुन दिली आहे.

मेंदूला पोषण, आठवणीला जागरण.. असे म्हणत रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियावर हाती बदामाची वाटी घेऊन व्हिडिओ शेअर केला आहे. आपण दिलेल्या घोषणेची आठवण करुन देण्यासाठी तुम्हाला हे बदाम पाठवण्यात येत आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---