⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

जिल्ह्यात तीन-तीन मंत्री पण.. रोहिणी खडसे नेमकं काय म्हणाल्या

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ ऑक्टोबर २०२३ । आदिवासी टोकरे कोळी समाजाचे विविध मागण्यांसाठी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ अन्नत्याग उपोषण सुरु आहे. आज या उपोषणस्थळी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष ॲड रोहिणी खडसे यांनी भेट देऊन आंदोलक समाज बांधवांसोबत चर्चा केली व आंदोलनास पाठिंबा दर्शवला. तसेच उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे आणि जिल्ह्यात तीन तीन मंत्री असूनही आतापर्यंत कोणीही उपोषणस्थळी भेट दिली नाही. असं यावेळी रोहिणी खडसे म्हणाल्या.

काय म्हणाल्या रोहिणी खडसे?
यावेळी बोलताना ॲड. रोहिणी खडसे म्हणाल्या, आदिवासी कोळी समाजातील टोकरे कोळी, ढोर कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळीचे जातीचे दाखले कोळी नोंदी वरून सरसकट मिळावेत. ज्या आदिवासी कोळी समाज बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यांच्या रक्ताच्या नात्यातील व्यक्तीना कोणतेही कागदपत्र न मागता जात वैधता प्रमाणपत्र मिळावे, आदिवासी कोळी समाजाच्या विकासासाठी महर्षी वाल्मिक ऋषी यांच्या नावे विकास महामंडळ स्थापन करावे. यासह विविध मागण्यांसाठी आदिवासी कोळी समाज बांधव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलनास बसले आहेत. समाज बांधवांच्या या मागण्या रास्त आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा या आंदोलनास पाठिंबा आहे.

आदिवासी कोळी समाज बांधवांच्या जात वैधता प्रमाणपत्रा बाबत आगामी अधिवेशनात सुध्दा आ एकनाथराव खडसे यांच्या माध्यमातून या प्रश्न मांडला जाईल असे ॲड. रोहिणी खडसे यांनी आंदोलकांना आश्वासन दिले.