आणखी काही गोष्टी बाहेर पडतील ! Wait and Watch…; चाकणकरांच्या राजीनाम्यावर रोहिणी खडसेंची पोस्ट, राजकारण तापणार?

मार्च 21, 2026 3:30 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी राजीनामा दिला आहे. महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरातला (Ashok Kharat) अटक झाली आहे. खरातसोबतचे काही फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती. या दबावानंतर अखेर चाकणकर यांनी राजीनामा दिला आहे.

rupali chakankar rohini khadse

दरम्यान, रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी प्रतिक्रिया देत खोचक इशारा दिला आहे. “म्हणून जास्त उडायचं नसतं ! आता सगळा अहंकार धुळीस मिळेल. आणखी काही गोष्टी बाहेर पडतील ! Wait and Watch…”अशा शब्दांत रोहिणी खडसे यांनी इशारा दिला आहे.

नेमक्या काय म्हणाल्या रोहिणी खडसे?

चाकणकर यांच्या राजीनाम्याची बातमी येताच रोहिणी खडसे यांनी सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट लिहिली त्यात त्या म्हणाल्या की, गर्वाचे घर नेहमीच खाली असते हे आता काही लोकांना कळलं असेल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना उद्देशून त्या म्हणाल्या की, माझी मा. मुख्यमंत्री महोदय, मा. सुनेत्रा वहिनी यांना विनंती आहे की त्यांनी फक्त राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा घेऊ नये तर या प्रकरणात जे जे लोक सामील आहेत त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हायला हवी याची खबरदारी घ्यावी. ज्या गोष्टी या प्रकरणात समोर येत आहेत त्या अत्यंत गंभीर आहेत. आणखी काही गोष्टी बाहेर पडतील ! Wait and Watch…असा इशारा देखील रोहिणी खडसे यांनी दिला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now