जळगाव लाईव्ह न्यूज । ६ ऑगस्ट २०२५ । पुण्यातील रेव्ह पार्टीत सात जणांना अटक झाली असून यात एकनाथ खडसेंचे जावई आणि रोहिणी खडसेंचे पती डॉ. प्रांजल खेवलकरला देखील अटक करण्यात आल्याने राजकीय वातावरण पेटलं आहे. प्रांजल खेवलकरसोबत या प्रकरणातील आरोपी न्यायालयीन कोठडीत असून मात्र, खेवलकरच्या वकिलांनी अजूनही कोर्टात जामिनासाठी अर्ज केला नाहीये. आता या प्रकरणात थेट राज्य महिला आयोगाने उडी घेतलीये. या प्रकरणातील आव्हाल हा मागवण्यात आलाय.

शिवाय प्रांजल खेवलकरने 28 वेळा स्वत:च्या नावाने हॉटेल बुक केल्याचे म्हटले असून प्रांजल खेवलकर यांनी परप्रांतीय मुलींना बोलावले होते आणि हे मोठे रॅकेट असू शकते म्हटले आहे. बीडमधील एका बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने महिला आयोगाला याबाबत पत्र दिले आहे. आता यावरून रोहिणी खडसे यांनी जोरदार निशाणा हा साधलाय. यासोबतच काही प्रश्नचिन्हही उपस्थित केली आहेत

नुकतेच माध्यमांतून महिला आयोगाने डॉ. खेवलकर यांच्या प्रकरणात पुणे पोलीस आयुक्तांना दिलेले पत्र वाचले.
— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) August 6, 2025
मुद्दा क्र. १ ज्या सानवी बहुद्देशीय सेवाभावी संस्थेने या प्रकरणात राज्य महिला आयोगात तक्रार दाखल केली आहे. ती संस्था राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला विभागाच्या बीड… pic.twitter.com/t33Ku3aEed
रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटले की, नुकतेच माध्यमांतून महिला आयोगाने डॉ. खेवलकर यांच्या प्रकरणात पुणे पोलीस आयुक्तांना दिलेले पत्र वाचले आहे. मुद्दा क्र. 1 ज्या सानवी बहुद्देशीय सेवाभावी संस्थेने या प्रकरणात राज्य महिला आयोगात तक्रार दाखल केली आहे. ती संस्था राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला विभागाच्या बीड जिल्ह्याची अध्यक्षा प्रज्ञा खोसरे यांची आहे.
मुद्दा क्र. 2 राज्यात महिलांच्या विरोधात इतके प्रकरण घडले, वैष्णवी हागवणे आत्महत्या प्रकरणासारखे हुंडाबळीचे प्रकरण घडले आहेत. यात खुद्द अजित पवार गटाच्या पुण्यातील महत्त्वाचे पदाधिकारी आरोपी आहेत. तेव्हा ही संस्था कुठे होती? राज्यात महिलांवर इतके अत्याचार होतात तेव्हा ही संस्था कुठे होती? मग आताच ही संस्था बाहेर कशी काढली गेली ?, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.
मुद्दा क्र. 3 राज्यातील अत्याचारग्रस्त महिलांची साधी विचारपूसही न करणाऱ्याला महिला आयोग अध्यक्षांना आज अचानक कसे कर्तव्य आठवले? इतके कसे कार्यतत्पर झाले? आपलाच बॉल, आपलीच बॅट आणि आपणच सिक्सर मारणार! सगळं व्यवस्थित स्क्रीप्टनुसार सुरू आहे, असे रोहिणी खडसे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.










