धक्कादायक ! केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा; कर्मचाऱ्यांना मारहाण करत रोकड लुटली

ऑक्टोबर 10, 2025 11:40 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑक्टोबर २०२५ । जळगाव जिल्ह्यात एकीकडे चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून यातच मुक्ताईनगरात केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मालकीच्या पेट्रोल पंपावर गुरूवारी रात्री उशिरा सशस्त्र दरोडा टाकून पंपावरील कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करून एक लाखाहून अधिक रक्कम लुटून नेल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. यावेळी दरोडेखोरांनी पेट्रोल पंपावर असलेल्या ऑफिसची तोडफोड देखील केलीय.

raksha khadse petrol pump

याबाबत असे की,मुक्ताईनगर तालुक्यात मुंबई नागपूर महामार्गावर केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मालकीचा रक्षा ऑटो फ्युएल्स नावाचा पेट्रोल पंप आहे. याच या पंपावर गुरूवारी साडेअकराच्या सुमारास दोन दुचाकीवर पाच जण आले होते. त्यांनी आजुबाजुला कोणी नाही हे लक्षात घेऊन पंपावरील प्रकाश माळी आणि दीपक खोसे या दोन्ही कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली. तसेच त्यांच्या डोक्याला गावठी बंदूक लावून जवळपास एक लाख रुपयांची रोकड त्यांच्याकडून हिसकावून घेतली.

तसेच पंपाच्या कार्यालयातील संगणक, प्रिंटर, सीसीटीव्ही डीव्हीआर आणि विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणांची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. दरोड्याच्या घटनेची माहिती मिळताच मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक आशिषकुमार अडसूळ हे कर्मचाऱ्यांसह पेट्रोल पंपावर पोहोचले. मात्र, तोपर्यंत सर्व दरोडेखोर बोहर्डी गावाच्या दिशेने पसार होण्यात यशस्वी झाले होते.

न्यायवैद्यक पथकाच्या मदतीने संशयितांचा शोध घेतला जात असून, पोलिसांचे दुसरे पथक त्यांच्या शोधासाठी रवाना करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.या घटनेमुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. जिल्ह्यात मे महिन्यातही चोपडा तालुक्यातील हातेड येथे एका पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, चोपडा ग्रामीण पोलिसांना त्यावेळी दरोडेखोरांचा प्रयत्न हाणून पाडला होता. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now