जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जानेवारी २०२२ । चोपडा तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयात सामान्य जनतेस त्रास होत असून शासकीय फी व्यतिरिक्त अव्वाच्या सव्वा रुपयांची मागणी केली जात आहे. सर्वसामान्य नागरिकांची दररोज हजारोंची लूट अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून होत असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हा उपाध्यक्ष अमृतराज सचदेव यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली आहे.
सचदेव यांनी तक्रारीत म्हटले आहे की, सर्वसामान्य नागरिकांना भूमी अभिलेख कार्यालयात काम करण्यासाठी हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. काही वेळेस कामाचे पैसे घेऊन सुद्धा नागरिकांना फिरवले जाते. जे नागरिक अतिरिक्त पैसे देतात त्यांचेच काम अधिकारी करतात. त्यामुळे या कार्यालयातील कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या संपत्तीची तत्काळ चौकशी करावी, अशी मागणी देखील राष्ट्रवादीचे माजी जिल्हा उपाध्यक्ष अमृतराज सचदेव यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडे दिलेल्या तक्रारी अर्जात केली आहे.
हे देखील वाचा :
- जळगाव शहरातून पुन्हा राजूमामा भोळे आमदार होणार? पाहा EXIT POLL
- जळगाव जिल्ह्यात सरासरी 65.77 टक्के मतदान
- निवडणूक ड्युटीवरून घरी परताना शिक्षकावर काळाचा घाला; अपघातात दुर्देवी मृत्यू
- जळगाव जिल्ह्यात सूक्ष्म नियोजनामुळे मतदान सुरळीत; मतदान यंत्रात नगण्य त्रुटी
- जळगाव जिल्ह्यात संध्याकाळच्या 5 पर्यंत 54.69 टक्के मतदान; अनेक ठिकाणी शेवटच्या तासात मतदारांच्या केंद्रावरती रांगा