पुरस्काराने माणुस अधिक गतीने काम करतो – प्रदिप महाजन
जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जून २०२२ । प्रत्येक जण पुरस्काराने सन्मानित होतो असे नाही, काही जणांना कुठलाही पुरस्कार नाही मिळाला तरी ते जोमाने काम करतात. आणि ज्यांना पुरस्कार मिळतात ते अधिक जोमाने आणि गतीने काम करुन आपल्या कामाशी प्रामाणिक राहण्याचे काम करत असतो. शैक्षणिक क्षेत्रात काम करतांना अनेकजण आपली कामानुसार छाप सोडत असतात, विद्यार्थी घडवणे, पिढी अद्ययावत करणे हे पाहीजे तेवढे सोपे काम नाही. यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे राहते म्हणुन त्यांची दखल वेगवेगळ्या संस्था ह्या घेतच असतात, असे प्रतिपादन धानोरा संस्थेचे शालेय समिती सदस्य प्रदिप महाजन यांनी आयोजित कार्यक्रमात केले.
धानोरा येथिल झि.तो. महाजन माध्यमिक व ना. भा. पाटील ज्युनिअर कॉलेज चे वरीष्ठ शिक्षक एस.पी. महाजन यांना धुळे येथिल रिअल इंडो ग्लोबल व्हिजन सोशल डेव्हलेपमेंट गुरुकुल फाउंडेशन धुळे यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने नुकतेच धुळे येथिल पोलिस अधिक्षक प्रविणकुमार पाटील व संस्थेने सन्मानित केले. त्यांचा गौरव भुसावळ येथिल सातपुडा शिक्षण संस्था, धानोरा शालेय समिती यांच्यातर्फे करण्यात आला. यावेळी सातपुडा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बी.एस. महाजन, चेअरमन सुखदेव पाटील, शालेय समितीचे सदस्य प्रदिप महाजन, चार्य के एन जमादार, उपमुख्याध्यापक एम एफ पाटील, पर्यवेक्षक के पी बडगुजर, वरीष्ठ लिपिक योगेश पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती कल्पना पाटील, पोलिस पाटील दिनेश पाटील, पिक संस्थेचे चेअरमन पन्नालाल पाटील यांच्यासह विद्यालयातील शिक्षक,शिक्षिका आदी उपस्थित होते.
यावेळी पुरस्कार्थी महाजन यांनी आपल्या मनोगतातुन आपल्या कार्याची दखल कशी घेण्यात आली याबाबत माहीती दिली. यापुढेही अधिक जोमाने काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. धुळे येथिल रिअल इंडो ग्लोबल व्हिजन सोशल डेव्हलेपमेंट गुरुकुल फाउंडेशन धुळे यांचा राज्यस्तरीय पुरस्कार हा महाजन यांचा एक विद्यार्थी सन १९९९ मध्ये नाशिक बोर्डात इतिहास विषयात प्रथम आला होता. इतिहास प्रज्ञा शोध परीक्षेत महाराष्ट्रातुन सन २००० मध्ये प्रथम आली होती. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष असतांना मराठी शाळेत लोकवर्गणीतुन शंभर बाक व भव्य प्रवेशद्वार करुन दिले. दुध संस्थेचे चेअरमन असतांना भव्य शाॕपिंग काॕम्पेक्स बांधलेत. यातुन अनेकांना रोजगार उपलब्ध झाला. मातृ-पितृ छत्र हरपलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप सहा वर्षापासून सुरु आहे.तसेच चोपडा तालुका शिक्षक पतपेढीत संचालक म्हणुन काम पाहत आहेत.तसेच इंडो ग्लोबल व्हिजन च्या राष्ट्रीय पुरस्कार समितीच्या खान्देश समन्वयक म्हणुन निवडही करण्यात आलेली आहे.