⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

अमळनेरात भरदिवसा घरफोडी,‎ लाखाेंचे दागिने लंपास

‎जळगाव लाईव्ह न्यूज । १८ डिसेंबर २०२१ । अमळनेरात भरदिवसा बंद घराचे कुलूप‎ तोडून चोरट्यांनी पाच लाख ६५‎ हजार रुपयांचे तसेच १३ तोळे सोन्याचे‎ दागिने लांबवल्याची घटना १६ रोजी दुपारी घडली.या प्रकरणी ज्ञानेश्वर‎ वारुळे यांच्या फिर्यादिवरून‎ घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे.‎

घटने प्ररकणी जळगाव येथील श्वान‎ पथक व ठसे तज्ञांना पाचारण करून‎ चोरट्यांचा मार्ग काढण्याचा प्रयत्न‎ पोलिसांनी केला.परंतू, ठोस सुगावा‎ पोलिसांच्या हाती लागला नाही.‎अमळनेर शहरातील केशव नगरातील‎ ज्ञानेश्वर वसंत वारुळे हे पत्नी व‎ मुलीसोबत धुळे रोडवरील‎ दवाखान्यात गेले होते. त्यांचे बंद घर‎ हेरून चोरट्यांनी घराच्या मागील‎ बाजूचे कुलूप तोडून आत प्रवेश‎‎ केला. कपाटातील २ लाख २८ हजार‎ रुपयांचे ५७.३२ ग्रॅम वजनाचे‎ सोन्याचे ब्रेसलेट, २ लाख रुपये‎ किमतीचा ५०.२० ग्रॅम वजनाचा‎ सोन्याचा गोफ, ९२ हजार रुपये‎ किमतीच्या २३.१५० ग्रॅम वजनाच्या‎ दोन सोनसाखळ्या, २० हजार‎ रुपयांची ५ ग्रॅमची सोन्याची अंगठी,‎ १२ हजाराचे ३ ग्रॅमचे कानातले, १३‎ हजार रुपये किमतीचे ९ भार चांदीचे‎ ब्रेसलेट, ७ भार चांदीची साखळी‎ असे एकूण ५ लाख ६५ हजार रुपये‎ किमतीचे दागिने अज्ञात चोरट्यांनी‎ लांबवले.या ठिकाणी पोलिस निरीक्षक जयपाल‎ हिरे, अनिल भुसारे, शत्रुघ्न पाटील,‎ सुनील हटकर, रवी पाटील, दीपक‎ माळी यांनी भेट दिली. ज्ञानेश्वर‎ वारुळे यांच्या फिर्यदिवरून‎ घरफोडीचा गुन्हा दाखल आहे.‎