असेही प्राणीप्रेम.. हरवलेला ‘सिंबा’ शोधून देणाऱ्यास मालकाकडून ‘इतक्या’ हजाराचे बक्षीस जाहीर

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ फेब्रुवारी २०२३ । एका हरवलेल्या कुत्र्याला शोधून देण्यासाठी त्याच्या मालकाने थेट बक्षीस जाहीर केलं आहे. जळगाव शहरातील प्रजापती नगर ममुराबाद रोड येथून ‘सिंबा’ नावाचा कुत्रा हरवला आहे.

‘सिंबा’ हा गेल्या महिन्यातील १५ जानेवारीला चोरीला किंवा हरवलेला आहे. ‘सिंबा’ गायब झाल्यावर त्याला शोधण्यासाठी त्याच्या मालकाने शर्थीचे प्रयत्न केले. आजूबाजूचा परिसरही पिंजून काढला. मात्र तो मिळाला नाही. हा डॉग परिवारातील सदस्याप्रमाणे आहे, तरी कोणाला दिसला तर संपर्क साधावा असे आवाहन ‘सिंबा’च्या मालकाने केले आहे. तसेच या कुत्र्याबद्दल माहिती देणाऱ्यास ३००० रुपयाचे बक्षीस जाहीर केलं आहे.

तरी कुणाला आढळून आल्यास मो. ७२७६२४७०६९ आणि ९४२३८३८८९५ यावर संपर्क साधावा.