पहिलीच्या वेळापत्रकातून हिंदी भाषा हद्दपार ; सुधारित वेळापत्रक जाहीर

जुलै 4, 2025 4:34 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जुलै २०२५ । राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. नुकताच राज्य सरकारने पहिलीपासून लागू केलेला हिंदी भाषा सक्तीचा निर्णय मागे घेतला. या निर्णयानंतर आता पहिलीच्या वेळापत्रकातून हिंदी भाषा हद्दपार झाली आहे. यानंतर सुधारित वेळापत्रक जाहीर
करण्यात आले आहे. नव्या वेळापत्रकानुसार कला, क्रीडा, कार्यानुभवाच्या कालावधीत वाढ करण्यात आला आहे.

nursary school jpg webp

पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा निर्णय सरकारने मागे घेतल्यानंतर ‘एससीईआरटी’ने अखेर सुधारित वेळापत्रक जाहीर केले. या सुधारित वेळापत्रकामध्ये हिंदी हा विषय हटविण्यात आला आहे. त्यामुळे आता मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळामध्ये केवळ या दोनच भाषा शिकवल्या जाणार आहेत. तर, कला, क्रीडा आणि कार्यानुभवाच्या तासिकांचा कालावधी पूर्ववत करण्यात आला आहे.

शाळांनी लवकरात लवकर विषयनिहाय तासिका विभागणीच्या आधारे वेळापत्रक तयार करावे, अशी सूचना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) केली. सुधारित वेळापत्रकात कला, क्रीडा, शारीरिक शिक्षण व कार्यानुभव या विषयांच्या तासिकांचा कालावधी कायम ठेवण्यात आला असून साप्ताहिक तासिकांमध्ये वाढ करण्यात आली आहे.

शारीरिक शिक्षण व कार्यानुभावा या दोन्ही विषयांसाठी एक अतिरिक्त तासिका देण्यात आली आहे. कलाशिक्षणाच्या दोन तासिका वाढविण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यानुसार निश्चित केलेल्या घड्याळी तासांच्या तुलनेत एसईआरटीने शारीरिक शिक्षण कार्यानुभावासाठी १५ मिनिटे अधिक कालावधी दिला आहे. कलाशिक्षणाचा कालावधी अर्धा तास कमी करण्यात आला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now