होळी, धूलिवंदनसाठी राज्य सरकारचे कुठलेही निर्बंध नाहीत, नवे परिपत्रक जारी

मार्च 17, 2022 5:09 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मार्च २०२२ । राज्यात होळी आणि धुलिवंदन धुमधडाक्यात साजरी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कारण होळी, धूलिवंदनसाठी राज्य सरकारचे कुठलेही निर्बंध नसून यासाठीची गृहखात्याने मार्गदर्शक सुचना दिल्या आहेत तसेच नवी नियमावली जाहीर केली आहे. नव्या परिपत्रकामुळे होळी साजरी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान दोन वर्षानंतर यंदा आधीप्रमाणेच उत्साहात होळी धुमधडाक्यात साजरी होणार आहे.

holi

जाणून घ्या काय कसे असणार नियम?

कोविड संक्रमणामुळे हा सण शक्यतो गर्दी न करता कोविड अनुरूप वर्तणुक नियमांचे पालन करून साजरा करण्यात यावा.

एकमेकांवर रंग टाकणे, पाणी टाकणे, एकमेकांना गुलाल लावून रंगाची उधळण करण्यात येते. परंतु यंदाची होळी साधेपणाने साजरी करावी

होळी, शिमगा निमित्त विशेष करून कोकणात पालखीची मिरवणूक काढण्यात येते. परंतु यावर्षी देखील पालखी घरोघरी न नेता स्थानिक प्रशासनाने उपाययोजना कराव्यात. तसेच गर्दी न होण्यासाठी नियमांचे तंतोतंत पालन होईल याकडे सर्वतोपरी लक्ष देऊन योग्य ती दक्षता घ्यावी.

कोवीडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण तसेच संबंधित महानागरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे पालन करावे

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now