अजितदादांना मोठा झटका ! खान्देशातील कट्टर समर्थकाचा तडकाफडकी राजीनामा

जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑगस्ट २०२४ । आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले असून अशातच अजित पवार गटाला आणखी एक मोठा धक्का बसलाय.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस राव मोरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. वैयक्तिक कारणामुळे आपण राजीनामा दिल्याचं मोरे यांनी म्हटलं आहे. राव मोरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नंदुरबारचे जिल्हाध्यक्ष अभिजीत मोरे यांचे बंधू आहेत. त्यांची नंदुरबार जिल्ह्यात मोठी ताकद असून तगडा जनसंपर्क आहे. त्यांनी अचानक राजीनामा दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे.
मोरे हे आता कोणत्या पक्षाचा झेंडा हाती घेणार? याबाबत तर्क वितर्क सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा फटका बसला. ५ पैकी केवळ एका जागेवरच पक्षाचा उमेदवार निवडून आला. त्यामुळे अजित पवार पुन्हा एकदा नव्या जोमाने कामाला लागले आहेत.