⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

निवासी डॉक्टरांनी आम्हाला १५ दिवसांचा अवधी द्यावा आम्ही मार्ग शोधतो – मंत्री गिरीश महाजन

जळगाव लाईव्ह न्यूज | २ जानेवारी २०२३ | राज्यभरातले निवासी डॉक्टर संपावर गेले आहेत. त्यामुळे रूग्णांचे हाल होतं आहेत. निवासी डॉक्टरांनी आम्हाला १५ दिवसांचा अवधी द्यावा आम्ही मार्ग शोधतो. असे आवाहन मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.

राज्यातल्या निवासी डॉक्टरांनी विविध मागण्यासाठी आजपासून संप पुकारला आहे. अतिदक्षता विभाग वगळता सर्व विभागांच्या सेवा बंद ठेवण्याचा इशारा मार्डने दिला. त्याच पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषद घेत निवासी डॉक्टरांना संप मागे घेण्याचं आवाहन केलं आहे.

निवासी डॉक्टरांचे अनेक प्रश्न आपण मार्ग लावली आहे. तसंच त्यांची जी एरिअर्सची मागणी आहे ती देखील आम्ही वित्तविभागाकडे दिली आहे. त्याचा पाठपुरावा सुरू आहे. आम्ही निवासी डॉक्टरांना हेदेखील सांगितलं की १५ दिवसात हा प्रश्न मार्गी लागेल. आम्ही सकारात्मक आहोत. सरकार सकारात्मक आहे अशात निवासी डॉक्टरांनी अशा प्रकारे संप पुकारणं योग्य नाही असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.

आम्हाला कुणावरही कारवाईची इच्छा नाही. मागच्या पाच वर्षात आम्ही कुणावरही कारवाई केलेली नाही. मार्डच्या डॉक्टरांनी आमच्यासमोर यावं आणि आमच्याशी समस्यांबाबत चर्चा करा असेही महाजन म्हणाले.