जळगाव लाईव्ह न्यूज । २४ डिसेंबर २०२१ । बाेदवड नगरपंचायतीच्या चार प्रभागांची निवडणूक ओबीसी आरक्षणाच्या निर्णयामुळे स्थगित करण्यात आली होती. अखेर गुरुवारी उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी रामसिंग सुलाने यांनी या चार प्रभागांचे निश्चित केलेले आरक्षण जाहीर करून निवडणूक कार्यक्रमाचीही माहिती दिली. त्यानुसार प्रभाग क्रमांक दाेन मध्ये सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक तीन मध्ये सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक १५ मध्ये सर्वसाधारण व प्रभाग क्रमांक १७ मध्ये सर्वसाधारण महिला या प्रमाणे आरक्षण जाहीर करण्यात आले आहेत.

२९ डिसेंबर ते ३ जानेवारी २२ पर्यंत सकाळी ११ ते ३ या वेळेत नामनिर्देशनपत्र सादर करावयाचे आहेत. १ व २ जानेवारीला दोन दिवस सुट्टी असल्याने नामनिर्देशनपत्र स्विकारले जाणार नाहीत. तसेच नामनिर्देशन पत्रांची छाननी व वैधरीत्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी ४ जानेवारीला प्रसिद्ध करण्यात येईल. माघारीसाठी अंतिम मुदत १० जानेवारी दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया १८ जानेवारीला हाेईल. तर मतमाेजणी १९ जानेवारीला करून निकाल जाहीर केला जाणार असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आकाश डोईफोडे यांनी दिली.
हे देखील वाचा :
- रेशन कार्डांबाबत मोठी अपडेट; वाचा अन्यथा रद्द होवू शकते तुमचे रेशनकार्ड
- शरद पवार, उध्दव ठाकरेंना मुख्यमंत्री पाचोऱ्यात प्रतिउत्तर देणार का ?
- धक्कादायक : बोगस डॉक्टरच्या उपचारामुळे यावल तालुक्यात महिलेचा मृत्यू
- सव्वा कोटींच्या टेंडरमध्ये २० लाखांची लाच कशी द्यावी लागली? ; आमदारांनी फोनवर एकविले डिलिंग
- एकनाथ शिंदे, फडणवीस, अजितदादा 26 ऑगस्टला पाचोऱ्यात