जळगाव लाईव्ह न्यूज । ६ ऑक्टोबर २०२५ । आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सोमवारी महाराष्ट्रातील 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींमधील नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. मंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली. दरम्यान, ३३ नगरपरिषदापैकी १७ नगरपरिषदासाठी अनुसूचित जाती महिला आरक्षण जाहीर झाले आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील भुसावळ आणि सावदा नगरपरिषदांचा समावेश आहे.

मागच्या काही दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाने जानेवारी महिना संपण्याच्या आधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले होते. त्यानंतर प्रशासन वेगाने तयारीला लागले आहे. आज सोमवारी मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील परिषद सभागृह येथे मंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली. यावेळी राजकीय पक्षाचे पदाधिकारी देखील उपस्थित होते.

दरम्यान, आपल्या शहराचे नगराध्यक्षपद कोणत्या प्रवर्गाकडे जाईल याची लोकप्रतिनिधींमधे प्रचंड उत्सुकता होती. आता जाहीर झालेल्या आरक्षणामुळे कोणत्या राजकीय पक्षाला फायदा किंवा तोटा होईल, हे आता काहीवेळातच समोर येईल.
३३ नगरपरिषदापैकी १७ नगरपरिषदासाठी अनुसूचित जाती महिला आरक्षण जाहीर –
देऊळगावराजा – महिला प्रवर्ग आरक्षित
मोहोळ – महिला प्रवर्ग आरक्षित
तेल्हारा – महिला प्रवर्ग आरक्षित
ओझर – महिला प्रवर्ग आरक्षित
वानाडोंगरी – महिला प्रवर्ग आरक्षित
भुसावळ – महिला प्रवर्ग आरक्षित
घुग्गूस – महिला प्रवर्ग आरक्षित
चिमूर – महिला प्रवर्ग आरक्षित
शिर्डी – महिला प्रवर्ग आरक्षित
सावदा- महिला प्रवर्ग आरक्षित
मैनदर्गी – महिला प्रवर्ग आरक्षित
दिगडोहदेवी – महिला प्रवर्ग आरक्षित
दिग्रस- महिला प्रवर्ग आरक्षित
अकलूज – महिला प्रवर्ग आरक्षित
बीड – महिला प्रवर्ग आरक्षित
शिरोळ – महिला प्रवर्ग आरक्षित
अनुसूचित जमातीमध्ये प्रवर्गात या नगरपरिषदांसाठी महिला आरक्षण जाहीर –
भडगाव (जळगाव)
वणी
पिंपळनेर (धुळे)
उमरी (नांदेड)
यवतमाळ
शेंदूरजनघाट












