⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

प्रजापिता इश्वरीय महाविद्यालयात रक्षाबंधन निमित्त धार्मिक कार्यक्रम

जळगाव लाईव्ह न्यूज । दिपक श्रावगे । सावदा येथे प्रजापिता ईश्वरीय महाविद्यालय ओम शांती केंद्र येथे रक्षाबंधनचे निमित्त राजयोगिनी ब्रम्हकुमारी मंगलादीदीजी ब-हाण पूर, व सावदा केंद्र वैशालीदीदी, यांनी रक्षाबंधन निमित्त भाविकांना संदेश दिला. ओम शांती केंद्रात हा कार्यक्रम झाला.

यावेळी ब्रम्हकुमारी मंगला यांनी रक्षाबंधन कशासाठी हे सांगताना जगात माणसास बंधने नको असतात. मात्र रक्षाबंधन असे आहे जे प्रत्येकास हवे असते, आज जगात भाऊ व बहीण अनेक किलोमीटर दूर अंतरावर राहतात अश्या वेळी रक्षणासाठी आपण जाऊ शकत नाही. त्यावेळी समाजातील इतर भाऊ त्यावेळी आपणास मदत करू शकतात, तसेच रक्षण फक्त भाऊ वा बहिणीचे नाही तर चांगल्या गोष्टी, वृक्ष, पर्यावरण, नदी इत्यादी नैसर्गिक गोष्टींचे देखील आपण रक्षण केले पाहिजे. या निमित्ताने आपण तसा संकल्प केला पाहिजे असे देखील त्यांनी आपल्या प्रबोधनात त्यांनी सांगितले.

यावेळी माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक राजेंद्र चौधरी, माजी उपनगराध्यक्ष दत्तात्रय महाजन, शुभम वानखेडे, पत्रकार शाम पाटील, दिपक श्रावगे, कैलास लवंगडे, जितेंद्र कुलकर्णी यांचे सह असंख्य भावीक उपस्थित होते, बघा त्याचा लाईव्ह व्हिडीओ