⁠ 
शनिवार, जानेवारी 11, 2025
Home | जळगाव जिल्हा | अमळनेर | अतिवृष्टी व पर्जन्यमानाची माहिती जाहीर करा : आम आदमी पार्टी

अतिवृष्टी व पर्जन्यमानाची माहिती जाहीर करा : आम आदमी पार्टी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ ऑगस्ट २०२२ । १ जून ते ऑक्टोबर २०२१ ची पर्जन्यमान आकडेवारी व अतिवृष्टीचे पंचनाम्याची सविस्तर माहिती जाहीर करा व आम आदमी पार्टीस त्याच्या नकला द्याव्यात अशी मागणी अमळनेर आम आदमी पार्टीच्या वतीने येथील तहसीलदारांकडे करण्यात आली आहे.

राज्यात 2021 चे अतिवृष्टीची नुकसानभरपाई देण्यात आली आहे. मात्र, अमळनेर तालुका या पासून वंचित राहिला असल्याने आम आदमी पार्टी आक्रमक झाली आहे. या संदर्भात आप चे शिवाजी पाटील, डॉ.रुपेश संचेती, तालुका संयोजक संतोष पाटील, भुपेंद्र पाटील, किरण भालेराव, नितीन पाटील, प्रवीण पाटील, सचिन करनकाळ, आकाश पाटील, अभिमन्यू चिखलोदकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. अशी माहिती धनंजय सोनार यांनी प्रसिद्धीस दिली आहे. दरम्यान, शेतकरी हितासाठी आम आदमी पार्टी संवेदनशील असून सातत्याने हा विषय लावून धरला असल्याने शेतकरी बांधवांनी आप चे आभार प्रकट केले.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह