⁠ 
शुक्रवार, मे 10, 2024

भरड धान्य खरेदीसाठी एरंडोल व धरणगावात नोंदणी सुरू

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Erandol News-जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑक्टोबर २०२२ । खरीप हंगामातील ज्वारी मका व बाजरी हे भरड धान्य शासकीय हमीभावाने खरेदीसाठी ७ ऑक्टोबर २०२२ पासून शेतकरी सहकारी संघ एरंडोल व धरणगाव येथील कार्यालयात कार्यालयीन वेळेत सकाळी ९ वाजेपासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत ऑनलाइन नाव नोंदणी सुरू आहे फॉर्म स्वीकारण्याची अंतिम मुदत १५ ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत राहील. शेतकऱ्यांनी भरड धान्य विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

नाव नोंदणी करताना सण २०२२-२३ या वर्षाचा ऑनलाईन खरीप पिक पेरा लावलेला सातबारा उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स अकाउंट नंबर पूर्ण प्रिंटेड असलेले हस्तलिखित चालणार नाही. बँकेचे चालू असलेल्या खाते देण्यात यावे बंद किंवा जॉईट खाते असलेले खाते देऊ नये अशी कागदपत्रे आवश्यक आहेत त्याशिवाय ऑनलाइन नाव नोंदणी होणार नाही तसेच अपूर्णा कागदपत्र स्वीकारले जाणार नाही कागदपत्रात काही त्रुटी निघाल्यास फॉर्म बाद झाल्यास सर्वस्वी जबाबदारी शेतकऱ्याची राहील या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन शेती संघाचे अध्यक्ष निळकंठ शंकर पाटील संचालक मंडळ व व्यवस्थापक अरुण पाटील यांनी केले आहे.