7,000mAh बॅटरी, 50MP कॅमेरा..! शाओमीचा स्वस्त Redmi 15 5G फोन भारतात लाँच

ऑगस्ट 20, 2025 1:29 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑगस्ट २०२५ । तुम्हीही Xiaomi कंपनीचा Redmi फोन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी खास बातमी आहे. शाओमीने भारतात रेडमी 15 5G मोबाईल लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये दमदार परफॉर्मन्स देणारी बॅटरी, कॅमेरासह आकर्षक फीचर्स दिले आहेत. बजेट सेगमेंटमध्ये प्रीमियम अनुभव देणारा हा खास फोन आहे. चला जाणून घेऊयात या फोनची किंमत आणि त्याची वैशिष्ट्ये?

Redmi 15 5G phone launched

Redmi 15 5G मध्ये 6.9-इंचाचा FHD+ अ‍ॅडॉप्टिव्ह सिंक डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 144Hz पर्यंत असून TUV Rheinland ट्रिपल सर्टिफिकेशन मिळाले आहे. यामुळे डोळ्यांचा ताण कमी होतो आणि सतत पाहणारे तसेच गेमर्ससाठी सिनेमा सारखा अनुभव मिळतो, असा Xiaomi चा दावा आहे. हा स्मार्टफोन तीन रंगांत उपलब्ध होईल Frosted White, Midnight Black आणि Sandy Purple. सॉफ्टवेअरच्या बाबतीत Redmi 15 5G हा Android 15 वर आधारित Xiaomi HyperOS 2 वर चालतो. यात Circle to Search, AI Erase, AI Sky आणि Gemini Live यांसारखी नवीनतम वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत.

हा स्मार्टफोन दमदार Snapdragon 6s Gen 3 प्रोसेसरसह सुसज्ज आहे. यात 8GB रॅम आणि जलद कार्यक्षमतेसाठी UFS 2.2 स्टोरेज दिले असून वापरकर्त्यांना उत्कृष्ट परफॉर्मन्सचा अनुभव मिळतो. कॅमेरा विभागात 50MP AI ड्युअल रिअर कॅमेरा आणि 8MP फ्रंट कॅमेरा असून AI Erase, AI Sky, AI ब्युटी यांसारखे स्मार्ट फीचर्स समाविष्ट आहेत.

मोठी बॅटरी आणि फास्ट चार्जिंग

या स्मार्टफोनमध्ये 7000mAhची मोठी बॅटरी देखील मिळणार आहे. जी 33 वॅट वायर्ड चार्जिंग आणि १८ वॅट रिव्हर्स चार्जिंगला सपोर्ट देखील मिळणार आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, फोन 55 तास कॉल टाइम किंवा 13.5 तास स्टँडबाय वेळ देऊ शकतो.

स्मार्टफोनची किंमत किती?

किंमतीकडे पाहिले तर 6GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 14,999 रुपये ठेवण्यात आली आहे, तर 8GB + 128GB मॉडेल 15,999 रुपये आणि 8GB + 256GB मॉडेल 16,999 रुपयांना उपलब्ध होईल. Redmi 15 5G ची अधिकृत विक्री 28 ऑगस्ट 2025 पासून Mi.com, Amazon.in, Mi Home आणि निवडक रिटेल स्टोअर्सवर सुरू होणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now