शिक्षक होण्याची सुवर्णसंधी! जळगावातील प्राथमिक शाळांमध्ये ४५६ जागांची भरती

ऑगस्ट 17, 2026 4:51 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या आणि भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. जिल्हा परिषद जळगावच्या प्राथमिक शाळांमधील रिक्त शिक्षक पदे भरण्यासाठी पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीत प्राथमिक शाळांमधील तब्बल ४५६ शिक्षक पदे भरण्यात येणार आहेत.

teacher Bharti 1

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी अर्थात TAIT-2025 मध्ये सहभागी झालेल्या पात्र उमेदवारांकडून या पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. जिल्हा परिषदेने यासंदर्भातील जाहिरात ६ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध केली आहे. या भरतीमध्ये मराठी माध्यमाची २५१ पदे, तर उर्दू माध्यमाची २०५ पदे उपलब्ध आहेत.

मराठी माध्यमाची २५१ पदे

मराठी माध्यमातील रिक्त पदांमध्ये इयत्ता १ ली ते ४ थी/५ वीकरिता १२६ पदे आहेत. इयत्ता ६ वी ते ८ वीकरिता गणित-विज्ञान विषयाची ८३ पदे, इंग्रजी विषयाची २० पदे, मराठी विषयाची ११ पदे आणि हिंदी विषयाची ११ पदे उपलब्ध आहेत.

उर्दू माध्यमात २०५ जागा

उर्दू माध्यमातील भरतीमध्ये इयत्ता १ ली ते ४ थी/५ वीकरिता १५० पदे आहेत. इयत्ता ६ वी ते ८ वीकरिता गणित-विज्ञान विषयाची ३७ पदे, तर उर्दू भाषा विषयाची १८ पदे भरण्यात येणार आहेत.

आवश्यक पात्रता

या भरतीसाठी उमेदवारांकडे संबंधित पदासाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता असणे गरजेचे आहे. तसेच इयत्ता १ ली ते ५ वी आणि इयत्ता ६ वी ते ८ वीच्या शिक्षक पदांसाठी संबंधित TET/CTET पात्रता पूर्ण असणे आवश्यक आहे. याशिवाय पात्र उमेदवाराने TAIT-2025 परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे बंधनकारक आहे.

पवित्र प्रणालीवर अर्ज करण्याचे आवाहन

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी पवित्र प्रणालीवर आपली वैयक्तिक माहिती नोंदवून जाहिरातीनुसार पात्र पदांसाठी पसंतीक्रम नमूद करून ऑनलाइन अर्ज करावा. अर्ज करण्यापूर्वी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता, आरक्षण, वयोमर्यादा, आवश्यक कागदपत्रे आणि इतर अटींची माहिती काळजीपूर्वक तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या भरतीची अधिकृत जाहिरात आणि रिक्त पदांचा सविस्तर तपशील जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक कर

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now