डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाच्या मेडीसीन विभागातर्फे २० ऑगस्ट रोजी सी.एम.ई परिषद

ऑगस्ट 18, 2026 5:08 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, जळगाव आणि जेरियाट्रिक सोसायटी ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने “जेरियाट्रिक मेडिसिन: फ्रॉम प्रिव्हेन्शन टू पॅलिएशन” (वृद्धपळातील वैद्यकीय उपचार: प्रतिबंधात्मक ते वेदनामुक्ती/उपशामक काळजी) या विषयावर गुरुवारी, २० ऑगस्ट २०२६ रोजी ’कंटिन्युइंग मेडिकल एज्युकेशन’ (सी.एम.ई.) परिषद आयोजित करण्यात आली आहे.

dr ulhas patil hospital

ही परिषद जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजच्या डॉ. केतकीताई पाटील सभागृहात सकाळी ९:०० ते सायंकाळी ५:०० या वेळेत पार पडणार असून, परिषद हायब्रिड मोड (प्रत्यक्ष व ऑनलाईन) अशा दोन्ही पद्धतीने घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडून (एम.एम.सी.) २ क्रेडिट पॉईंट्स लागू करण्यात आले आहेत.

प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शक मुख्य मार्गदर्शक डॉ. उल्हास पाटील (माजी खासदार व अध्यक्ष, गोदावरी फाउंडेशन) डॉ. वर्षा पाटील, डॉ. केतकीताई पाटील, डॉ. वैभव पाटील (कार्डियोलॉजिस्ट), डॉ. प्रशांत सोळंके (डीन) आयोजक अध्यक्ष डॉ. सी. डी. सारंग (प्राध्यापक व विभागप्रमुख, मेडिसिन विभाग) आयोजक सचिव डॉ. युवराज बढेे (सह-प्राध्यापक, मेडिसिन विभाग)या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते मेडीसीन विभागातील तज्ज्ञ डॉ. सी.डी. सारंग, डॉ. सी.ए. कांते, डॉ. युवराज बढे, डॉ. पल्लवी बढे, डॉ. अभय जोशी, डॉ. विजया दाते, डॉ. अनिता बसवराज, डॉ. अंजली शेटे, डॉ. अपर्णा साधळे, डॉ. प्रमोद उमरजी, डॉ. भूषण चोपडे, डॉ. चिमू चोपडे, डॉ. गुणवंत महाजन हे मार्गदर्शन करणार आहेत. नोंदणी व संपर्कया परिषदेसाठी वैद्यकीय अधिकारी, पदव्युत्तर व पदवीचे विद्यार्थी तसेच डॉक्टर सहभागी होऊ शकतात.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now