स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये माजी सैनिकांसाठी भरती

ऑक्टोबर 29, 2021 6:59 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑक्टोबर २०२१ । स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये माजी सैनिकांसाठी ‘सुरक्षा रक्षक’ या पदासाठी भरती आयोजित करण्यात आली आहे. यासाठी पात्र असलेल्या माजी सैनिकांनी ८ नोव्हेंबरपर्यंत आपले नाव नोंदवावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी राहूल पाटील यांच्याकडून करण्यात आले आहे.

sbi

रोजगारासाठी पात्र असलेल्या माजी सैनिकांसाठी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये माजी सैनिक प्रवर्गातून महाराष्ट्र राज्यात सुरक्षा रक्षकच्या जागा भरावयाच्या आहेत. या पदासाठी दि. १ ऑक्टोबर रोजी वय ४५ वर्षापेक्षा कमी, शिक्षण ८ वी किंवा समकक्ष पास पण १२ वी पास नसावा, सैन्यसेवा कमीत कमी १५ वर्ष झालेली असावी, सैन्य दलातील हुद्दा हवलदार पदापेक्षा कमी अथवा समकक्ष असावा, चारित्र्य कमीत कमी चांगले असावे, मेडीकल कॅटेगरी आय/शेप-१ असावा.

या पदाकरीता इच्छुक व पात्र असलेल्या माजी सैनिकांनी डिसचार्ज बुक, पी.पी.ओ. एम्पलॉयमेंट कार्ड, माजी सैनिक ओळखपत्र व इतर सैन्य कागदांपत्रासह कार्यालयीन वेळेत ८ नोव्हेंबरपर्यंत आपले नांव नोदवावे. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक ०२५७-२२४१४१४ वर संपर्क साधावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी राहूल पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now