
जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मार्च २०२२ । सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी संधी आहे. कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये (Reserve Bank of India) विविध पदांची भरती होणार असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ग्रेड बी ऑफिसर्स आणि असिस्टंट मॅनेजरच्या रिक्त पदांसाठी ही भरती होणार आहे.
याअंतर्गत एकूण 303 पदे भरली जाणार आहेत. यामध्ये ग्रेड बी अधिकाऱ्यांची 294 पदे आणि सहाय्यक व्यवस्थापकाच्या 9 पदांचा समावेश आहे. कसा, कुठे आणि कधी अर्ज करायचा हे जाणून घेऊया…
आवश्यक शैक्षणिक पात्रता
आरबीआय ग्रेड बी भरती 2022 च्या जाहिरातीमध्ये पात्रतेची अधिकृत माहिती अद्याप देण्यात आली नाही. पण गेल्या वर्षीच्या गेल्या वर्षीच्या नोटिफिकेशननुसार, अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा इतर उच्च शिक्षण संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असून किमान 60 टक्के गुण असावेत. किमान 55 टक्के गुणांसह पीजी उत्तीर्ण झालेले उमेदवार देखील अर्ज करू शकतात.
वयाची अट :
दुसरीकडे, बँकेने विहित केलेल्या तारखेनुसार उमेदवारांचे वय 21 वर्षांपेक्षा कमी आणि 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
हे पण वाचा :
- पदवीधरांसह ITI उमेदवारांसाठी मोठी भरती; सतीश धवन स्पेस सेंटरमध्ये ४०० जागांसाठी भरती
- इंडियन बँकेत तब्बल १ हजार ५०० अप्रेंटिस पदांची भरती; पदवीधर तरुणांना मोठी संधी
- ‘MPSC गट-क’च्या पदांमध्ये विक्रमी वाढ! ५,७०७ वरून थेट १६,७१७ पदे
- मध्य रेल्वेत अप्रेंटिसच्या २८६१ जागांसाठी भरती; भुसावळ विभागात ५०० पदे
- 10वी पासपासून पदवीधरांसाठी मोठी संधी! ONGC मध्ये तब्बल 3047 जागांसाठी भरती
महत्त्वाच्या तारखा
RBI ने जारी केलेल्या संयुक्त जाहिरातीनुसार, जाहिरात केलेल्या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सोमवार, 28 मार्चपासून म्हणजेच पुढील आठवड्यात सुरू होईल. उमेदवारांना 18 एप्रिल 2022 च्या संध्याकाळी सहावाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यानंतर, ग्रेड बी अधिकारी (सामान्य) पदांसाठी पहिल्या टप्प्यातील ऑनलाईन परीक्षा 28 मे रोजी आणि दुसऱ्या टप्प्याची ऑनलाईन परीक्षा 25 जून 2022 रोजी होणार आहे. अर्थशास्त्र आणि सांख्यिकी विभागांसाठी पहिल्या टप्प्यातील परीक्षा 2 जुलै रोजी आणि दुसरा टप्पा 6 ऑगस्ट रोजी घेण्यात येईल. दुसरीकडे सहाय्यक व्यवस्थापक पदांसाठी ऑनलाइन लेखी परीक्षा 21 मे 2022 रोजी होणार आहे.
असा करा अर्ज
आरबीआय ग्रेड बी भरती 2022 साठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची अधिकृत वेबसाइट rbi.org.in वर जा. होमपेजवरील ऑनलाइन अर्जाच्या लिंकद्वारे अर्ज भरा. अर्ज प्रक्रिया जाहीर केलेल्या तारखेला म्हणजेच 28 मार्च 2022 ला सुरू होईल. आरबीआयच्या करिअर विभागात देण्यात आलेली तपशीलवार सूचना डाऊनलोड करा.





