⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

जुलै महिन्यात 14 दिवस बँका बंद राहणार ; RBI कडून सुट्ट्यांची यादी जाहीर

जळगाव लाईव्ह न्युज । २८ जून २०२२। जून महिना संपायला अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहे. त्यानंतर जुलै महिना सुरु होईल. या जुलैमध्ये मोठे सण येत आहेत, त्यामुळे तुमचे बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम असेल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. कारण जुलैमध्ये एकूण 14 दिवस बँका बंद राहतील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने जुलै 2022 च्या बँक सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार पुढील महिन्यात 14 दिवस बँकांमध्ये कोणतेही काम होणार नाही. यात 2रा आणि 4था शनिवार आणि रविवारच्या साप्ताहिक सुट्ट्यांचा देखील समावेश आहे.

सर्व राज्यांसाठी वेगवेगळे नियम
RBI च्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या सुट्ट्यांच्या यादीनुसार, बँकिंग सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये साजरे होणारे सण किंवा त्या राज्यांमधील विशेष प्रसंगी नोटिफिकेशनवर देखील अवलंबून असतात. या सर्व सुट्ट्या सर्व राज्यांमध्ये लागू होणार नाहीत. अशा परिस्थितीत जुलै महिन्यात बँकांचे कामकाज सुरळीत करण्यासाठी घराबाहेर पडण्यापूर्वी बँकांच्या सुट्ट्यांची यादी पाहून नक्कीच बाहेर पडा नाहीतर तुमचा दिवस बरबाद होईल.

सुट्ट्यांची संपूर्ण यादी तपासा (जुलै 2022 मधील बँक सुट्ट्यांची यादी)
1 जुलै: कांग (रथयात्रा) / रथयात्रा – भुवनेश्वर-इम्फाळमध्ये बँका बंद राहतील.
3 जुलै: रविवार (साप्ताहिक सुट्टी)
5 जुलै: मंगळवार – गुरु हरगोविंद सिंग यांचा प्रकाश दिवस – जम्मू-काश्मीरमध्ये बँका बंद राहतील.
7 जुलै: खारची पूजा – आगरतळ्यात बँका बंद राहतील.
9 जुलै: शनिवार (महिन्याचा दुसरा शनिवार), ईद-उल-अजा (बकरीद)
10 जुलै: रविवार (साप्ताहिक सुट्टी)
11 जुलै: ईद-उल-अझा- जम्मू आणि श्रीनगरमध्ये बँका बंद राहतील.
13 जुलै: भानू जयंती- गंगटोकमध्ये बँका बंद राहतील.
14 जुलै: बेन डिएनखलम – शिलाँगमध्ये बँका बंद राहतील.
16 जुलै: हरेला-डेहराडूनमध्ये बँका बंद राहतील.
17 जुलै: रविवार (साप्ताहिक सुट्टी)
23 जुलै: शनिवार (महिन्याचा चौथा शनिवार)
24 जुलै: रविवार (साप्ताहिक सुट्टी)
31 जुलै: रविवार (साप्ताहिक सुट्टी)