जळगाव लाईव्ह न्यूज । २७ मार्च २०२५ । HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. रिझर्व्ह बँके ऑफ इंडियाने (RBI) एचडीएफसी बँकेला ७५ लाखांचा दंड ठोठावला आहे. बँकेने केवायसीसंदर्भात काही नियमांचे पालन केले नाही. त्यांच्या गाइडलाइन्सचे पालन केले नाही. त्यामुळे दंड ठोठावण्यात आला आहे. याआधीही रिझर्व्ह बँकेने अनेक बँकांना दंड ठोठावला आहे.

आरबीयच्या मते, एचडीएफसी बँकेने काही ग्राहकांना जोखिम श्रेणीनुसार वर्गीकृत केले नाही. ग्राहकांना कमी, मध्यम किंवा उच्च जोखीम या तीन कॅटेगरीत वर्गीकृत करायचे असते. तसेच काही ग्राहकांना युनिका आयडेंटिफिकेशन कोड देण्याऐवजी अनेक आयडेंटिफिकेशन कोड दिले आहे. हे आरबीआयच्या गाइडलाइन्समध्ये हे बसत नाही.
आरबबीआयने केएलएम अॅक्सिवा फिनवेस्टलादेखील दंड ठोठावला आहे. तब्बल १० लाखांचा दंड आहे. ही एक नॉन डिपॉझिट नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी (NBFC) आहे. या कंपनीनेदेखील RBI (NBFC-Scale Based Regulation), Direction 2023 अंतर्गत डिविडेंटसंबंधित नियमांटे पालन केले नाही. त्यामुळे या कंपनीलाही दंड ठोठावण्यात आला आहे.
ग्राहकांच्या पैशांचं काय?
रिझर्व्ह बँकेच्या या बँकांविरुद्ध कारवाईनंतर बँकेच्या ग्राहकांना घाबरण्याची गरज नाही. हा दंड नियामक त्रुटींवर आधारित असून बँकेने त्याच्या ग्राहकांसोबत केलेल्या कोणत्याही व्यवहारांवर अथवा करारावर याचा परिणाम होणार नसल्याचे आरबीआयने म्हटले आहे.