फैजपूर विभागीय अधिकारी नरेंद्र पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर शहरात पोलिसांचे पथसंचलन

जुलै 20, 2021 11:05 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २० जुलै २०२१ । रावेर प्रतिनिधी | रावेर शहरात बकरी-ईद सण शांततेत पार पडावे व कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी या उद्देशाने फैजपूर विभागीय अधिकारी नरेंद्र पिंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत, आज दि.२० जुलै मंगळवार रोजी शहरातील प्रमुख मार्गावरून पथसंचलन करण्यात आले.

raver police route march

यावेळी रावेर ठाण्याचे पोलीस निरिक्षक रामदास वाकोडे, एपीआय शीतल कुमार नाईक, पीएसआय अनिस शेख, पीएसआय मनोज वाघमारे, पीएसआय मनोहर जाधव, आरसीपी पालटून चे 1+17, तसेच रावेर पोलिस ठाण्याचे 32 पोलीस कर्मचारी यांनी मिळून रावेर शहरात, रावेर पोलिस ठाण्यापासून ते आंबेडकर चौक, बऱ्हाणपूर जिलेबी, पंचशिल नगर, इमामवाडा, संभाजी नगर पुल, नागझरीवाडा, थळा भाग, पाराचा गणपती, गांधी चौक, ते सराफरोड व डॉ.आंबेडकर चौक अशा रावेर शहरातील प्रमुख मार्गांवरून पथसंचलन सायंकाळी ६ ते ७ वाजेपर्यंत करण्यात आले. यावेळी रावेर पोलीस ठाण्याचे डीबी पथक व गोपनीय चे मंदार पाटील, राजेंद्र करोडपती, महेंद्र सुरवाडे, सुरेश मेढे, सुकेस तडवी हजर होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now