⁠ 
रविवार, सप्टेंबर 8, 2024
Home | वाणिज्य | ..अन्यथा तुम्हाला 1 जुलैपासून रेशन मिळणार नाही ; ‘हे’ काम त्वरित करा

..अन्यथा तुम्हाला 1 जुलैपासून रेशन मिळणार नाही ; ‘हे’ काम त्वरित करा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मे २०२३ । सरकारच्या मोफत रेशन योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. ती म्हणजे जर तुमचे रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक नसेल तर सरकार तुमचे रेशन कार्ड रद्द करेल. यापूर्वी त्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२३ होती. जी आता 30 जून 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

म्हणजेच जर 30 जून 2023 पर्यंत रेशन कार्ड आणि आधार लिंक केले नाही तर तुमचे रेशन कार्ड आपोआप रद्द होईल आणि तुम्हाला 1 जुलैपासून रेशनमध्ये गहू-तांदूळ मिळणार नाही. त्यामुळे मुदत संपण्यापूर्वी हे काम मार्गी लावा. अन्यथा शिधापत्रिका रद्द केल्याने तुम्हाला आणखी अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

रेशनकार्ड आधारशी ऑनलाइन कसे लिंक करावे
सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) पोर्टलच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
आधार कार्ड क्रमांक, शिधापत्रिका क्रमांक आणि नोंदणीकृत मोबाइल फोन नंबर यासारखे तपशील प्रविष्ट करा.
यानंतर Continue टॅबवर क्लिक करा.
नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर OTP पाठवला जाईल.
ओटीपी टाकून रेशन कार्ड-आधार कार्ड लिंकवर क्लिक करा.

याप्रमाणे ऑफलाइन लिंक करा
रेशनकार्डचे फोटोस्टॅट सोबत कुटुंबातील सर्व सदस्यांच्या आधारकार्डचे फोटोस्टॅट घ्या.
जर तुमचे आधार बँक खात्याशी लिंक केलेले नसेल तर बँक पासबुकचे फोटोस्टॅट देखील घ्या.
यानंतर, कुटुंब प्रमुखाचा पासपोर्ट आकाराचा फोटो घ्या आणि तो शिधावाटप कार्यालय किंवा सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) किंवा रेशन दुकानात जमा करा.
आधार डेटाबेससाठी ती माहिती प्रमाणित करण्यासाठी तुम्हाला सेन्सरवर फिंगरप्रिंट आयडी देण्यास सांगितले जाईल.
विभागाला कागदपत्रे मिळाल्यानंतर तुम्हाला एसएमएस किंवा ईमेलद्वारे कळवले जाईल.
संबंधित अधिकारी तुमच्या कागदपत्रांसह पुढील प्रक्रिया पूर्ण करेल. यानंतर, रेशन कार्ड आणि आधार लिंक झाल्यावर तुम्हाला कळवले जाईल.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.