आज रागावर नियंत्रण ठेवा, या गोष्टीत होऊ शकतो विश्वासघात; वाचा मंगळवारचे राशिभविष्य

सप्टेंबर 23, 2024 11:13 PM

मेष
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुम्हाला चिंतांपासून मुक्ती मिळेल. तुम्हाला कोणत्याही कामाचे टेन्शन असेल तर ते बऱ्याच अंशी दूर होईल. रागावर नियंत्रण ठेवा. प्रेमसंबंधात एखाद्या व्यक्तीमुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात. त्यामुळे तात्काळ गैरसमज दूर करा. खाण्यावर नियंत्रण ठेवा

rashi

वृषभ
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमची काही प्रलंबित कामे पूर्ण होतील. तुम्ही काही महत्त्वाच्या कामासाठी धावपळ कराल. ऑफिसात बॉसला अधिककाळ फसवू नका. कधी ना कधी चोरी पकडली जाईल. वर्क फ्रॉम होमचा फार आग्रह धरू नका, नाही तर अडचणीचं ठरेल.

मिथुन
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला राहील. तुमच्यात चढ-उतार असतील, पण तुम्ही चांगले पैसे कमवण्यात यशस्वी व्हाल. बिझनेसमध्ये तुमचा विश्वासघात होऊ शकतो. गळ्यात इन्फेक्शन होईल. त्यामुळे घसा दुखू लागेल. खोकल्याचा त्रास होईल.

कर्क
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास नाही. व्यवसायात तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो.कोणत्याही कठिण प्रसंगात स्वत:ला बाहेर काढण्यासाठी स्वत: प्रयत्न करा. व्यवसायात नवीन ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे.

सिंह
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कोणत्याही वादात पडू नये असा आहे. तुम्हाला एखाद्या गोष्टीची चिंता असेल. आज तुमच्या हातून एक मोठी संधी जाणार आहे. तुमच्या आळशी स्वभावामुळे ही संधी हुकणार आहे. नोकरीमध्ये टार्गेट पूर्ण करणाऱ्यांना सन्मान मिळण्याची शक्यता आहे

कन्या
कन्या राशीच्या लोकांसाठी आज तुम्हाला तुमच्या बोलण्यावर आणि वागण्यावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. तुमच्या तब्येतीत काही बिघाड झाला असेल तर तोही निघून जाईल.

तूळ
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगती करेल. विशेष कामानिमित्त सहलीला जावे लागू शकते. आर्थिक देवाणघेवाण करताना जपून. नाही तर मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा असेल. कामासाठी भावांची मदत घ्यावी लागेल. आजचा दिवस अत्यंत कडकीचा जाणार आहे. प्रेयसीसोबत डेटिंगला जाण्याचा बेत रद्द कराल.

धनु
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फलदायी राहील. काही पैशांबाबत तुमच्या कुटुंबात वाद होईल. ऑफिसमधील तुमचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी वरिष्ठांची मदत घ्या. आरोग्याच्या बाबतीत टंगळमंगळ करू नका. नाही तर तब्येत खालावेल.

मकर
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास असेल. तुम्हाला तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याकडून काही वाईट बातमी मिळू शकते. शेअर मार्केटमध्ये तुम्हाला आज अधिक फायदा होण्याची शक्यता आहे. पण कोणतीही गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

कुंभ
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा चांगला राहील. व्यवसायात तुम्हाला नवीन प्रकल्प मिळू शकतो. जुन्या मित्राची अचानक भेट होईल. आज तुम्हाला दु:खाची बातमी कळण्याची शक्यता आहे.

मीन
मीन राशीच्या लोकांना आज पैसा आणि आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागेल. तुमचा निष्काळजीपणा तुम्हाला त्रास देईल.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now