गुन्हेजळगाव शहर

Crime : वयोवृध्दांना हेरून मारायचे डल्ला, परप्रांतीय टोळी पोलिसांच्या जाळ्यात

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जुलै २०२२ । वयोवृद्धांना हेरून डल्ला मारणाऱ्या दोघा संशयितांना जिल्हा पेठ पोलिसांनी अटक केलीय. ते दोघे संशयित आरोपी रस्त्याने चालणाऱ्या वृद्धांना, बँकेत गेलेल्या वृद्धना, एटीम मध्ये व्रुद्धांना, बाजारात गेलेल्या वृद्धांना हेरून त्यांच्यावर डल्ला मारून त्यांच्याकडील ऐवज लंपास करीत होते. याबाबत पोलिसांत गुन्हा दाखल होता, अखेर पोलिसांत त्या दोघा संशयितांना अटक आहे. दरम्यान, दोघा संशयित आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

crime 2022 07 08T102848.667 jpg webp

अब्दुल अलीम मोहम्मद सलीम (वय.५८ रा. जलालनगर ता सदर जि. शहाँजहापुर आणि बाबुलाल कस्तुरीलाल अग्रवाल (वय.६६ रा बरेली उ.प्र) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. फिर्यादी देवराम बाबुलाल चौधरी (वय ७२) व्यवसाय शेती रा रामेश्वर कॉलनी, जळगांव हे पोष्ट ऑफीस, जळगांव येथे त्यांचे बचत खात्यातुन 1 लाख 50 हजार रु. काढून, ते त्यांचे बँक ऑफ बडौदा येथे असलेल्या खात्यावर जमा करणे कामी जात असताना, त्यांचेवर पाळत ठेवुन त्यांचा पाठलाग करुन त्यांचे बॅगेला ब्लेड मारून रोख एक लाख चोरी झाल्याचे जिल्हापेठ पोलीसांत गुन्हा दाखल होता.

त्यावरुन जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे पोकाँ/936 रविन्द्र साबळे हे दि.०६/०७/२२ रोजी साध्या वेशात गस्तीवर असताना व वरील गुन्ह्यातील प्राप्त सी.सी.टि.व्ही. फुटेज मधील चोरटे हे पोष्ट ऑफिस परिसरात संशयित रित्या फिरत असल्याचे त्यांचे चाणाक्ष नजरेने हेरले व त्यांचे हालचाली वर लक्ष ठेवून त्यांनी तात्काळ स.पो.नि राजेन्द्र पवार तसेच गुन्हे शोध पथकातील पो.उप.नि गणेश देशमुख, पोहेकाँ/सलीम तडवी, पोना/जुबेर तडवी, पोकाँ/ अमितकुमार मराठे यांना फोनवरून माहिती दिली. पथकाने सापळा रचुन त्यांना पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

Related Articles

Back to top button