जळगाव लाईव्ह न्युज | २३ एप्रिल २०२२ | मातोश्रीवर आजपर्यंत भल्याभल्यांनी घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणीही यामध्ये सफल होऊ शकले नाही. अतिरेक्यांपासून ते हिट लिस्टवर असलेल्या नामांकित गुन्हेगार यांनी मातोश्रीवर घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र ते जाऊ शकले नाहीत. यांच्यापुढे राणा दांपत्य तर मच्छर जात आहे. अशी घणाघाती टीका आमदार गुलाबराव पाटील यांनी रवी राणा व नवनीत राणा यांच्यावर केली.
ते पुढे म्हणाले की , ज्यांच्याकडे स्वतःच्या जातीच प्रमाणपत्र नाही ते दुसऱ्याला हिंदुत्व शिकवायला निघाले आहेत. राणा दांपत्याचा बोलवता धनी कुणीतरी दुसराच आहे. असेही यावेळी गुलाबराव पाटील म्हणाले.
राणा दाम्पत्यांनी आम्ही उद्धव ठाकरे यांच्या घरा बाहेर हनुमान चालीसा ऐकवणार अशी घोषणा केली आणि गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत राजकीय आंदोलन पेटले आहे. राणा दाम्पत्यांनी आम्ही उद्धव ठाकरे यांच्या घरा बाहेर हनुमान चालीसा ऐकवणार अशी घोषणा केली आणि गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत राजकीय आंदोलन पेटले आहे. शनिवारी सकाळपासूनच शिवसेना कार्यकर्त्यांनी मातोश्रीबाहेर आणि नवनीत राणा यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर गर्दी केली होती.यावेळी शिवसैनिकांनी मुंबई उद्धव साहेबांची नाही कोणाच्या बापाची या घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला होता. अखेर मुंबई पोलिसांनी आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांना अटक केली आहे.