जळगाव जिल्हा

सहा.संचालक डॉ विवेकानंद गिरी यांची डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयास भेट

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । केंद्र सरकारच्या स्वास्थ व परीवार कल्याण सहा संचालक डॉ.विवेकानंद गिरी यांनी कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमातर्गत डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांचेसोबत जळगाव जिल्हा जि.प.कुष्ठरोग विभाग सहायक संचालक डॉ. जयवंत मोरे, वैद्यकिय अधिकारी डीएनटी डॉ इरफान तडवी हे देखिल उपस्थीत होते.

प्रारंभी डॉ. गिरी आणि टीमचे स्वागत महाविद्यालयाचे अधिष्टाता डॉ प्रशांत सोळंके डॉ. दिलीप ढेकळे,डॉ निलेश बेंडाळे यांनी केले. या भेटीत डॉ. गीरी यांनी कुष्ठरोग रूग्णांवर उपचार करणाऱ्या त्वचारोग विभागाच्या कार्याची माहिती देखिल करून घेतली. तसेच त्वचारोग विभागाचे प्रमुख डॉ पंकज तळेले व निवासी वैद्यकिय अधिकाऱ्यांना चर्चासत्रातून मार्गदर्शन करतांना जिल्हयाच्या आदीवासी बहुल भागातून आजही कुष्ठरोग रूग्णांचे निदान होत असून त्यांचेवर त्वरीत निदान व उपचाराची दिशा तसेच त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीवर प्रतिबंधनात्मक उपचाराची दिशा याबददल मार्गदर्शन करतांना आपली राष्ट्रीय कुष्ठरोग नियंत्रण योजना ही आधुनिक उपचारांमुळे अत्यंत यशस्वी झाली आहे. गेल्या दशकात कुष्ठरोगाचे प्रमाण कमी झाले आहे.

कुष्ठरोग नियंत्रण योजना चालविणारे पॅरेमेडिक कर्मचारी आणि रिफॅम्पिसीन औषधाचे संशोधक यांना हे श्रेय जाते. ज्यांना अगदी एखादाच चट्टा आहे अशांनाही मल्टी ड्रग थेरेपी करण्यात येतो. बहुधा तरुणपणात किंवा मध्यमवयातच या रोगाची चिन्हे दिसतात. ज्यांना कुष्ठरोगाविरुध्द चांगली प्रतिकारशक्ती असते त्यांना सहसा हा आजार होत नाही. यावर आता प्रभावी औषधे निघाल्याने बहुतेकांचा आजार सहा महिने ते दीड वर्ष या काळात पूर्ण बरा होतो. त्यासाठी कायमचे नुकसान होण्याआधीच या रोगाची सुरुवातीची लक्षणे ओळखून उपचार व्हायला पाहिजेत. असे सांगितले यावेळी अधिष्टाता डॉ.प्रशांत सोळंके, जनऔषध वैदयकशास्त्राचे डॉ. दिलीप ढेकळे,डॉ निलेश बेंडाळे यांनी देखिल मार्गदर्शन केले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button