यापुढे इतरांच्या डोळ्यातून पाणी काढणार – रामदास कदम

जुलै 23, 2022 9:14 PM

ramdas kadam 1 jpg webp

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जुलै २०२२शिवसेना नेते रामदास कदम यांनी यापुढे आपल्या डोळ्यात अश्रू येणार नसून आपण दुसर्‍यांच्या डोळयातून पाणी काढू असा इशारा दिला आहे. एका खासगी वृत्त वाहिनीच्या मुलाखतीत ते बोलत होते. रामदास कदम हे काही दिवसांपूर्वी मीडिया समोर गहिवरले होते. शिवसेनेबाबत बोलतांना त्यांना अश्रू अनावर झाले होते. त्यांच्या रडण्यावरून संजय राऊत, आदित्य ठाकरे आदी नेत्यांनी जोरदार टीका केली होती.अश्यावेळी आता माझ्या डोळ्यात अश्रू येणार नसून आपण दुसर्‍यांच्या डोळयातून पाणी काढू असे रामदास कदम म्हणाले.

बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला अन्यायाविरुद्ध लढण्याची आणि संघर्षाची शिकवण दिली आहे. त्यामुळे गुडघे टेकणारा रामदास कदम नाही. तसेच ते पुढे म्हणाले की, यापुढे मी डोळ्यांतून पाणी काढणार नाही. मात्र समोरच्याला डोळ्यांतून पाणी नक्की काढायला लावेल असा इशारा त्यांनी दिला.यावेळी ते असेही म्हणाले कि राज ठाकरे यांच्या शिवसेनेतल्या एक्सिटमुळे मला वाईट वाटलं होत.

आपण कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटलो त्यांच्याशी दोन महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली आहे. यात मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत मुख्यमंत्री शिंदेंनी सकारात्मकता दर्शविली आहे. यानंतर गोवा-मुंबई महामार्गाचे काम पूर्ण करण्याविषयी विचारले असता, शिंदे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करुन ताबडतोब महामार्गाचे काम पूर्ण करु असं अश्वासन दिलं आहे.असं कदम म्हणाले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now