जळगाव जिल्हा
आमदारांसह भाजपा पदाधिकाऱ्यांनी ऐकले ‘मन कि बात’
जळगाव- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आकाशवाणीद्वारे ‘मन कि बात’या कार्यक्रमाचये रविवारी रोजी करण्यात आले होते. यावेळी वसंत स्मृती भाजप कार्यालय येथे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे (राजू मामा), महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम ऐकण्यात आला. या प्रसंगी जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, महेश जोशी, मन की बात कार्यक्रमाचे प्रमुख विठ्ठल पाटील, प्रा. सिंग भगतसिंग निकम, कार्यालय मंत्री प्रकाश पंडित, नगरसेवक राजेंद्र मराठे, जितेंद्र मराठे, व राहुल पाटील, दिशांत जोशी आदी उपस्थित होते.