⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

पहूर पोलिसांची मोठी कारवाई, लाखोंचा गुटखा पकडला!

जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑगस्ट २०२२ । जिल्ह्यासह ग्रामीण भागात अवैध गुटख्याची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहेत. दि. ३० जुलै रोजी सायंकाळी तोंडापूर गावाजवळ पहूर पोलिसांनी अवैद्य गुटखा पडकला आहे. यात सुमारे ८ लाख ३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच चाळीसगाव शहर पोलिसांनी देखील दोन दिवसापूर्वी अवैद्य गुटखासह ९२ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात केला होता. दरम्यान, हा प्रकार वारंवार समोर येत असल्याने जिल्ह्यातील सर्व भागातील पोलीस प्रशासन सतर्क झाली असून अवैध गुटख्याची वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

जामनेर तालुक्यातील नेरी ते जळगाव रस्त्यावर अवैधरीत्या गुटखा, पानमसाला, तंबाखू घेवून जाणार कंटेनर जामनेर पोलिसांनी ३० मे रोजी पकडला होता. यात सुमारे ७ लाख ४८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता. तर जळगाव शहरातील आकाशवाणी चौकातील लाली पान सेंटर येथे बेकायदेशीररित्या गुटखा व पानमसाला विक्री करणाऱ्यावर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली होती. तसेच चाळीसगाव ग्रामीण पोलिसांना ५ रोजी एका कंटेनरवर संशय आल्याने त्याचा पाठलाग केला असता. चक्क त्यात अंदाजे १ कोटीचा गुटखा आढळुन आला होता.

त्यानंरत पुन्हा पहूर पोलिसांनी दि. ३० जुलै रोजी सायंकाळी तोंडापूर जवळ ही कारवाई केली. यात सुमारे ४ लाख ३ हजारांचा गुटखा व ४ लाख किमतीचे वाहन असे एकूण ८ लाख ३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. संशयित आरोपी राजू शंकर चौधरी (वय ५४) यांच्याविरुद्ध अवैध गुटखा वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास संजय बनसोड, पुहर करत आहेत.