⁠ 
शनिवार, डिसेंबर 14, 2024
Home | महाराष्ट्र | बाळासाहेबांचा ‘तो’ व्हिडिओ राज ठाकरेंनी केला ट्विट ! व्हिडीओमध्ये काय?

बाळासाहेबांचा ‘तो’ व्हिडिओ राज ठाकरेंनी केला ट्विट ! व्हिडीओमध्ये काय?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मे २०२२ । मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray News) शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा एक व्हिडीओ ट्वीट केला. 36 सेकंदाचा हा व्हिडीओ आहे.

व्हिडीओमध्ये काय?

व्हिडीओमध्ये बाळासाहेब ठाकरे मशिदींतील लाऊडस्पीकर हटवण्याबाबत बोलत असून ज्या दिवशी या महाराष्ट्रात माझं सरकार येईल त्यावेळी रस्त्यावरील नमाज बंद केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. कारण धर्म असा असावा लागतो की, जो राष्ट्रविकासाच्या आड येता कामा नये. लोकांना त्याचा उपद्रव होता कामा नये. आमच्या हिंदू धर्माचा कोणाला उपद्रव होत असेल तर त्याने येऊन आम्हाला सांगावं, आम्ही त्याचा बंदोबस्त करायला तयार आहोत. लाऊडस्पीकर मशिदीवरचे खाली येतील, बंद.

दरम्यान, मशिदींतील लाऊडस्पीकर हटविण्याचा आज ४ मे रोजीचा अल्टिमेटम राज ठाकरेंनी राज्य सरकारला दिलेला होता. त्यानंतर आज काही प्रमाणात मशिदींवरील भोग्यांना हनुमान चालिसेनं उत्तर मनसेच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात येतंय. मात्र राज ठाकरेंनी आधीच केलेल्या आवाहनाला मुस्लिम बांधवांनी सकारात्मक प्रतिदास दिला. त्यामुळे बहुतांश ठिकाणी मशिदींनी भोंग्याच्या आवाजाचा नियम पाळला. तर काहींनी भोंगा वापरणंच टाळलं. या सगळ्यात राज ठाकरेंनी ट्वीट केलेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या व्हिडीओनं चर्चांना उधाण आलंय. एकप्रकारे राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंचा व्हिडीओ ट्वीट करत शिवसेनेला पुन्हा डिवचण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा रंगली आहे.

दरम्यान, मुंबई पोलिसांनी राज ठाकरे यांना मंगळवारी संध्याकाळी CrPC कलम 149 अंतर्गत कोणताही वाद होऊ नये म्हणून नोटीस बजावली होती. मात्र, मनसे कार्यकर्त्यांवर पोलिसांच्या नोटीसचाही काहीही परिणाम झाला नसून अनेक भागात लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा वाजवल्याचे प्रकरण समोर आले आहे. यानंतर कारवाईचा भाग म्हणून मुंबई पोलिसांनी मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.