जळगाव शहरासह परिसरात पावसाची हजेरी, पण..

जून 19, 2022 2:29 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जून २०२२ । जळगाव जिल्ह्यात मान्सून दाखल होऊन सहा दिवस उलटले तरी देखील दमदार पावसाने हजेरी लावली नाहीय. दरम्यान, आज रविवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास जळगाव शहरासह परिसर पावसाने हजेरी लावली आहे. मात्र, पेरणी योग्य होत नसल्याने (Kharif Season) खरीप हंगामावरील चिंतेचे ढग हे कायम होते.

rain jpg webp

गेली दोन दिवसापासून जिल्ह्यातील अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. गेल्या सोमवारी जळगाव जिल्ह्यात मान्सून दाखल झाला होता. त्यामुळे मान्सून दमदार हजेरी लावेल अशी अपेक्षा होती. मात्र तेव्हापासून मान्सून हुलकावणी देत आहे. आज दुपारी शहरासह परिसरात पावसाच्या सरी कोसळल्या. मात्र जोरदार पावसाची जिल्ह्यातील शेतकरी वाट पाहात आहेत.

दरम्यान, पुढील आठवड्यापासून पावसाचा (Rain) जोर वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागानं राज्यात पुढील आठवड्यापासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याचं म्हटलं आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now