राज्यातील आजचा पावसाचा अंदाज काय? जळगावात कशी राहणार पावसाची स्थिती? जाणून घ्या..

ऑगस्ट 3, 2023 11:07 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ ऑगस्ट २०२३ । काही दिवसाच्या विश्रांतीनंतर राज्यामध्ये पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. येत्या ३ ते ४ दिवसांत राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाजही पुणे हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, आज जळगाव जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.

rain jpg webp

दरम्यान, हवामान खात्याने आज कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच पालघर जिल्ह्याला देखील ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि पुणे या दोन जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

त्याचबरोबर संपूर्ण विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यातही यलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने काही भागातील शेती पिकांना मोठा फटका बसला आहे.

दरम्यान, विश्रांतीनंतर जळगाव जिल्ह्यात पुन्हा पाऊस सुरु झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त होणार आहे. मागील दोन तीन दिवसापासून जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होत असल्याने पिकांना आधार मिळत आहे. मात्र जिल्ह्यात अद्यापही मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील अनेक प्रकल्प खाली आहेत. त्यामुळे काही ठिकाणी पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now