जळगाव लाईव्ह न्यूज । १० जून २०२१ । निसर्गाचे अनेक चमत्कार आपणास अनेकदा पहावयास मिळतात. असाच एक अद्भूत चमत्कार एरंडोल पाहायला मिळाला आहे. एरंडोल येथील साने गुरूजी कॉलनीतील नागरिकांनी पावसासोबत चक्क लहान दगड पडल्याचा अनुभवला आहे. यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत असे की, एरंडोल मध्ये ७ जून रोजी संध्याकाळी ६:३० ते ७:०० वाजेदरम्यान जवळपास अर्धातास तुरळक पाऊस झाला. यावेळी पावसासोबत अचानक दगड आकाशातून पडतांना साने गुरुजी कॉलनीत राहणार्या नागरिकांनी पाहिले. हे अद्भूत व चमत्कारीक दृश्य पाहून कॉलनीतील रहीवासी अवाक् झाले.
सदरील खडे वाळूतील खड्यांप्रमाणे असल्याने वेचण्यासाठी रहीवाश्यांनी डोक्यावर लोखंडी घमेली ठेवली.काही भाविकांनी हे खडे आपल्या घरातील देव्हार्यात ठेवले. हा खड्यांचा पाऊस ५०ते ६० फूट परीसरात सानेगुरूजी कॉलनीत ८ते१० घरांवरच पडला अशी माहीती प्रत्यक्षदर्शींनी दिली. याबाबत नागरीकांमध्ये तर्कवितर्कांच्या सरी कोसळणे माञ अद्याप सूरूच आहे.