⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

Rain Alert : पुढील पाच दिवस पावसाचे, अर्ध्या महाराष्ट्राला यलो अलर्ट

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जुलै २०२२ । सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये धो-धो- पाऊस बरसत आहे. जूनमध्ये ओढ दिलेल्या पावसाने जुलैमध्ये पावसाने जोर पकडला आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं पाहायला मिळतेय. दरम्यान, हवामान खात्याकडून राज्यातील गोंदिया, गडचीरोली या जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता. उद्या मंगळवारी नागपूर, गोंदिया, गडचीरोली, वर्धा या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर २० व २१ रोजी जळगाव जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांना ग्रीन अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राज्यात जून महिन्यात मान्सूनने अनेक ठिकाणी पाठ फिरवली होती. मात्र जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईसह कोकणात तर पावसाने अक्षरश: थैमान घातले आहे. राज्यातील अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. अशातच आज गोंदिया, गडचीरोली या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता. उद्या मंगळवारी नागपूर, गोंदिया, गडचीरोली, वर्धा या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर २० व २१ रोजी पर्यंत जळगाव जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांना ग्रीन अलर्ट जारी करण्यात आला आहे.

जळगाव जिल्ह्यात देखील मागील काही दिवसापासून समाधानकारक पाऊस बरसत असलयाने शेतकरी सुखावला आहे. सुरुवातीला मान्सूनने पाठ फिरविल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर चिंतेचे ढग दाटून आले होते. मात्र, जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यापासून जिल्ह्यात पाऊस कोसळत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पेरणीचे काम जवळपास आटपले आहे. जिल्ह्यासाठी २० ते २१ जुलै पर्यंत ग्रीन अलर्ट जारी करण्यात आला आहे.