⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

IMD अलर्ट : येत्या काही तासात जळगावात विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसणार

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जून २०२२ । राज्यातील अनेक भागाला मान्सूनपूर्व (Pre-Monsoon Rain) पावसाने झोडपून काढले आहे. मान्सून येत्या २४ तासात महाराष्ट्रात धडकणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. मात्र त्यापूर्वी मान्सूनपूर्व पाऊस कोसळत आहे. अशात आता हवामान खात्याने येत्या काही तासात जळगावसह मुंबई, ठाणे, अहमदनगर आणि बीड जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. आज जळगाव जिल्ह्याला यलो अलर्ट जारी करण्यात आला असून हे लक्षात घेता नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी असे आवाहन भारतीय हवामान विभागाने केले आहे.

राज्यातील मान्सून वेळेआधी दाखल होणार असल्याचा अदांज हवामान खात्याने वर्तविला होता. मात्र यंदा दोन दिवस आधी केरळात दाखल झालेला मान्सूनचा पुढील प्रवास खोळंबला. त्यामुळे राज्यात देखील मान्सूनची शेतकरीसह सर्वसामान्य आतुरतेने वाट पाहत आहे. अशातच २४ तासात मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार असल्याचा अदांज आहे.

त्यापूर्वी राज्यातील अनेक जिल्ह्यांध्ये वादळी वाऱ्यासह आलेल्या मान्सूनपूर्व पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. जळगाव जिल्ह्यात देखील गुरुवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. काल राज्यात वादळी तडाख्यामुळे ६ जणांचा बळी घेला आहे. . यात चौघांचा अहमदनगरमधील संगमनेर येथील, तर नाशिक आणि जळगावमध्ये प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

दरम्यान, येत्या काही तासांत मुंबई, ठाणे, जळगाव, अहमदनगर आणि बीड जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या दरम्यान ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने सोसाट्याच्या वाऱ्यासह हा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा इशारा देतानाच नागरिकांनी घराबाहेर पडताना खबरदारी घ्यावी, असे हवामान विभागाने म्हटले आहे.